सिद्धी शुगर एफआरपी प्रमाणेच दर देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:35+5:302021-09-22T04:23:35+5:30

येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, पी.जी. ...

Siddhi Sugar will pay the same rate as FRP | सिद्धी शुगर एफआरपी प्रमाणेच दर देणार

सिद्धी शुगर एफआरपी प्रमाणेच दर देणार

येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, पी.जी. होनराव, सुरज पाटील यांची उपस्थिती होती. आमदार बाबासाहेब पाटील म्हणाले, विनायकराव पाटील यांनी कारखाना मोडकळीस आणला. तालुक्यातील हजारो शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान केले. आजपर्यंत शेतक-यांच्या ऊसाचा मोबदला कधीच थकीत राहीला नाही.सिद्धी शुगर्स ॲड अलाईड लिमिटेड कारखाना हा शेतक-यांच्या ऊसाला रिकव्हरीवर भाव देतो. जे साखर आयुक्ताच्या निकषानुसारच आहे. कारखाना चालवण्यास घेतल्यापासून आजपर्यंत ऊस बिलापोटी ११०० कोटी रूपयांची रक्कम अदा केली आहे. तालुक्यातील सर्व शेतक-यांच्या ऊसाच्या नोंदीनुसारच कारखाना गाळपासाठी ऊस घेऊन जातो. केवळ मतदार संघातील विकास कामामुळे विरोध केला जात असल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Siddhi Sugar will pay the same rate as FRP