बंधाऱ्यामधून वाळूचा उपसा, पाेलिस पथकाने टाकला छाप; ११ जणांविरुद्ध गुन्हा, ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त
By राजकुमार जोंधळे | Updated: May 19, 2025 13:12 IST2025-05-19T13:12:09+5:302025-05-19T13:12:36+5:30
यावेळी ६० लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बंधाऱ्यामधून वाळूचा उपसा, पाेलिस पथकाने टाकला छाप; ११ जणांविरुद्ध गुन्हा, ६१ लाखांचा मुद्देमाल जप्त
शिरूर अनंतपाळ (जि. लातूर) : तालुक्यातील डोंगरगाव उच्च पातळी बॅरेजसाठी संपादित शेंद-हालकी शिवारातील मोकळ्या जागेत चोरट्या मार्गाने वाळूचा अवैध उपसा करण्यात येत असल्याची खबर मिळताच सहायक पोलिस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी ६० लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, याबाबत शिरुर अनंतपाळ पाेलिस ठाण्यात ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, डोंगरगाव उच्च पातळी बंधाऱ्याच्या शेंद हालकी शिवारातील संपादित मोकळ्या जमिनीत संगनमत करून अवैध वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या चाकूरचे पोउपनि. अच्यूत सूर्यवंशी, पोहेकाॅ. सिराज शेख, सोनकांबळे, आंधोरीकर, रायभोळे, कोळेक, पूनम शेटे यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी लोखंडी बोटी व संक्शन पंप, उपसा केलेली २० ब्रास वाळू, पोकलेन, टिप्पर आदी ६० लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत पोउपनि अच्युत सूर्यवंशी यांनी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून इरफान शेख, ईश्वर पाटील (दोघे रा. निलंगा), टिपरचालक अर्जुन डेचे (रा. औराद शहाजानी, ह. मु. निलंगा), हायवाचालक आदित्य पाटील (रा. निलंगा), पोकलेनमालक, चालक, असे ४ ते ५ अशा जवळपास ११ जणांविरुद्ध कलम ३०३ (२),३ (५), भारतीय न्याय दंड संहिता व कलम ४८ (७),४८ (८) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ कलम ३, पर्यावरण संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोउपनि. अन्सापुरे हे करीत आहेत.