रेणापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:22 IST2021-02-05T06:22:39+5:302021-02-05T06:22:39+5:30

बंदला भारत मुक्ती मोर्चा, व्ही. एस. पँथर्स, मराठा सेवा संघ, व्यापारी, दुकानदारांनी पाठिंबा दर्शविला. व्यापारी आपली दुकाने बंद ठेवली ...

Renapur Bandla spontaneous response | रेणापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

रेणापूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

बंदला भारत मुक्ती मोर्चा, व्ही. एस. पँथर्स, मराठा सेवा संघ, व्यापारी, दुकानदारांनी पाठिंबा दर्शविला. व्यापारी आपली दुकाने बंद ठेवली होती. साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना शासनाने दिलेला पुरस्कार परत घ्यावा. गुन्हा दाखल करावा. तसेच सदरील पुस्तकावर शासनाने बंदी घालावी, अशा मागण्या करण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व गोर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले. आंदोलनास जिल्हा सचिव दयानंद राठोड, ॲड. संतोष पवार, शरद राठोड, संघर्ष मित्रमंडळाचे रमेश चव्हाण, माजी सभापती प्रदीप राठोड, माजी सभापती विजय चव्हाण, रवी चव्हाण, अजय चक्रे, विलासराव देशमुख युवा मंचचे सचिन इगे, रवी चव्हाण, उत्तम चव्हाण, बालाजी जाधव, बालाजी राठोड, बंटी राठोड, गोर सेनेचे तालुकाध्यक्ष विलास राठोड, सचिव बाळू चव्हाण, विकास बंजारा, अजय राठोड, धोंडिराम चव्हाण, कैलास चव्हाण, अतुल राठोड आदींनी सहकार्य केले.

Web Title: Renapur Bandla spontaneous response