शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

रेणा प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडून नदीपात्रात पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

चार वर्षांमध्ये रेणा मध्यम प्रकल्प हा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला असून यावर अवलंबून असणाऱ्या पाणी पुरवठा योजना व सिंचनाचा ...

चार वर्षांमध्ये रेणा मध्यम प्रकल्प हा पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरला असून यावर अवलंबून असणाऱ्या पाणी पुरवठा योजना व सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे संपूर्ण तालुक्यातील शेतकरी व नागरिक आनंदित आहेत. रेणापूर तालुक्यांमध्ये गेल्या आठ दिवसापासून मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. ऑगस्टच्या सुरुवातीला रेणा मध्यम प्रकल्पात १४ टक्के जलसाठा होता. मुरंबी व जोगाईवाडी हे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने त्याच खाली असलेला रेणा मध्यम प्रकल्प हा भरण्यास सुरुवात झाली, बघता बघता पाच दिवसांमध्येच हे धरण पूर्ण क्षमतेने भरले. या धरणात मोठ्या प्रमाणात येवा येत असल्यामुळे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता या धरणांमध्ये ९६ टक्के जलसाठा जमा झाला. सततच्या पावसामुळे पाण्याचा वेग वाढत गेला, मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता रेण मध्यम प्रकल्पाचे प्रथम दहा सेंटिमीटर दोन दरवाजे उघडण्यात येऊन १७.८२ क्युमेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यानंतर प्रकल्पाचे सहाही दारे १० सेमीने ११.४५ वाजता उघडण्यात येऊन नदीपात्रात ५३.४६ क्युमेक्स विसर्ग ने पाणी सोडण्यात आले. रेणा मध्यम प्रकल्पातून दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास ७१.६३ क्युसेक एकूण विसर्ग करण्यात आला. या पाण्यामुळे नदीला पूर आला असून जुन्या पुलावरून पाणी वाहत आहे. प्रकल्पातून सोडलेले पाणी बघण्यासाठी रेणा नदीच्या नवीन मोठ्या पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रेेणापूर पोलीस कर्मचारी यांचाा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चार वर्षांत पहिल्यांदा भरला प्रकल्प...

सततच्या पावसामुळे आणि मुरंबी, जोगाईवाडी हे धरण भरल्याने रेेणा मध्यम प्रकल्पात मोठ्या प्रमाणात येवा येत होता. त्यामुळे हा प्रकल्प साडेनऊ वाजता ९६ टक्के भरला. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून साडेदहा वाजता प्रथम दोन दरवाजे उघडून रेणा नदीपात्रात पाणी सोडले. नंतर टप्प्याटप्प्याने सहाही दरवाजे उघडण्यात आल्याचे शाखा अभियंता श्रीनाथ कुलकर्णी यांनी सांगितले.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश...

पाण्याची येण्याची क्षमता पाहून दरवाजे बंद किंवा उघडण्याची प्रक्रिया चालू राहील. त्यामुळे या नदीपात्रावरील शेतकरी, गावकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन तहसीलदार राहुल पाटील यांनी सांगितले. दरम्यान, रेणापूरचे उपनगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, नगरपंचायत प्रशासन, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट हे लक्ष ठेवून आहेत.