उदगीरकरांना दिलासा, नवे ३७ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:21 IST2021-05-06T04:21:10+5:302021-05-06T04:21:10+5:30

येथील कोविड रुग्णालयात बुधवारी आरटीपीसीआर तपासणीत ९ तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये २८ बाधित आढळले. इतर ठिकाणाहून पाच रुग्णांना उपचारासाठी दाखल ...

Relief to Udgirkar, 37 new affected | उदगीरकरांना दिलासा, नवे ३७ बाधित

उदगीरकरांना दिलासा, नवे ३७ बाधित

येथील कोविड रुग्णालयात बुधवारी आरटीपीसीआर तपासणीत ९ तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये २८ बाधित आढळले. इतर ठिकाणाहून पाच रुग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर १२ जणांना घरी सोडण्यात आले. कोरोनाबाधित ७ तर नॉन कोविड ४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सध्या कोविड रुग्णालयात ६६, अरुणा अभय ओसवाल संस्थेत १६, पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहात १४, तोंडार पाटी येथील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथे ३२, तोंडार पाटी येथील कोविड केअर सेंटरमध्ये ३५, जयहिंद मुलांचे वसतिगृह येथे ५, विविध खासगी कोविड रुग्णालयात १२१ तसेच होम आयसोलेशनमध्ये ५९ अशा एकूण ३५० बाधितांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी दिली.

Web Title: Relief to Udgirkar, 37 new affected