शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

गाळेधारकांकडून साडेअकरा लाखांची वसुली; सहा दुकानांना पथकाने केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST

लातूर महानगरपालिकेच्या मालकीचे ११२७ आणि बीओटी तत्त्वावरील ८१० असे एकूण १९३७ गाळे आहेत. या गाळेधारकांकडे १३ कोटी २० लाख ...

लातूर महानगरपालिकेच्या मालकीचे ११२७ आणि बीओटी तत्त्वावरील ८१० असे एकूण १९३७ गाळे आहेत. या गाळेधारकांकडे १३ कोटी २० लाख २६ हजार २०७ रुपये भाडे थकलेले आहे. यात ६ कोटी ६१ लाख २७ हजार ६३० रुपये चालू भाडे आहे. त्यामुळे महानगरपालिकेने विशेष वसुली मोहीम सुरू केली आहे. १९ कोटी ८१ लाख ५३ हजार ८३७ रुपयांची वसुली करण्यात येणार आहे. मंगळवारी गांधी मैदानातील क्रमांक १११ तळमजला व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडून वसूल करण्यात आली. वसुली मोहिमेत आठ लाख १२ हजार ३३७ रुपये चेकद्वारे तर ३ लाख ५५ हजार रुपये नगदी असे एकूण ११ लाख ६७ हजार ३३७ रुपयांची वसुली करण्यात आली. तर वसुलीला प्रतिसाद न देणाऱ्या सहा गाळेधारकांचे दुकान सील करण्यात आले. यातील दोघांनी थकलेली रक्कम भरल्यानंतर सील करण्यात आले. दरम्यान, वसुली मोहीम उपायुक्त वसुधा फड, सहायक आयुक्त सुंदर बोंदर ,मालमत्ता व्यवस्थापक सतीश टेंकाळे, क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, समाधान सूर्यवंशी, संजय कुलकर्णी, मालमता विभागातील कर्मचारी जगन्नाथ पवार, पवन सुरवसे, अभिषेक माळवे, रामजीवन लोखंडे, अकबर शेख, अमदज शेख आदी कर्मचाऱ्यांच्या पथकाने यशस्वी केली.