शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण संख्येत झपाट्याने घट; मंगळवारी आढळले ५१ बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:24 IST

लातूर: जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने घटत असून मंगळवारी नवे ५१ बाधित रुग्ण आढळले तर १६० कोरोनामुक्त झाले आहेत. ...

लातूर: जिल्ह्यात कोरोनाची रुग्ण संख्या झपाट्याने घटत असून मंगळवारी नवे ५१ बाधित रुग्ण आढळले तर १६० कोरोनामुक्त झाले आहेत. आता बाधितांच्या आलेख ८९ हजार ६१७ वर पोहोचला आहे. तर यातील ८६ हजार ३८७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत ९३३ रुग्ण विविध कोविड केअर सेंटर तसेच गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत २ हजार २९७ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत मंगळवारी २९७ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात १६ रुग्ण बाधित आढळले आहेत. तर १८३५ व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली. त्यात ३५ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. दोन्ही चाचण्या मिळून ५१ रुग्णांची भर पडली आहे. तर उपचारादरम्यान मंगळवारी पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून रुग्ण संख्येत घट होत आहे. दररोज हजारावर रुग्णसंख्या गेली होती. मात्र आता दोन अंकी रुग्ण संख्या आढळत आहे. त्यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. मृत्यूच्या संख्येतही घट आहे. सद्यस्थितीत ९३३ रुग्ण उपचार घेत आहेत. यापैकी ९६ रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. तर १३ रुग्ण गंभीर मेकानिकल व्हेंटिलेटरवर आहेत. ५६ रुग्ण बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर आहेत. १८३ रूग्ण मध्यम लक्षणांची परंतु ऑक्सिजनवर आहेत. तर १०६ रूग्ण मध्यम लक्षणांची परंतु विनाऑक्सिजनवर असून ५७५ रुग्ण सैम्य लक्षणाची उपचार घेत आहेत. ९३४ रुग्णांपैकी ५५८ दवाखान्यात तसेच कोविड केअर सेंटर मध्ये दाखल आहेत. तर ३७५ रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

१६० रुग्णांना मिळाली सुटी...

गृहविलगीकरणात तसेच कोविड सेंटर आणि दवाखान्यात उपचार घेत असलेल्या १६० रुग्णांची प्रकृती ठणठणीत झाल्याने त्यांना मंगळवारी सुटी देण्यात आली. सदर रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था तसेच सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल गांधी चौक,एक हजार मुला मुलींचे वस्तीगृह, शासकीय तंत्रनिकेतन आणि खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.

मेकॅनिकल व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण: १३

बीआयपीएपी व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण: ५६

ऑक्सीजनवर असलेले रुग्ण: १८३