शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
2
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
3
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
6
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
7
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
8
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
9
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
10
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
11
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
12
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
13
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
14
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
15
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
16
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Top Marathi News LIVE Updates: महाराष्ट्र दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे मुख्यमंत्री फडणवीसांना खास पत्र
18
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
19
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
20
प्रेयसीने नाकारलं, टी-शर्टवर तिचा फोटो अन् टॅटू काढलेला तरुण थेट विजेच्या खांबावर चढला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पाठ फिरवल्याने भाजीपाला लागवडीची पाच कोटी रोपे करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 14:04 IST

च कोटी रोपे पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे़

- बालाजी थेटे 

औराद शहाजानी (जि़ लातूर) : दक्षिण भारतातून मराठवाड्यात येणारे मोसमी वारे अद्यापही पोहोचले नसल्याने त्याचा परिणाम लातूर जिल्ह्यातील शेतीवर झाला आहे़ पावसाच्या आशेवर १५ दिवसांत लागवड करण्यात आलेली भाजीपाल्याची जवळपास पाच कोटी रोपे पाण्याअभावी करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे़

लातूर जिल्ह्यात व कर्नाटक सीमा भागात दरवर्षी मोसमी पावसाअगोदर मोसमीपूर्व पाऊस चांगला होतो़ या आशेवर यंदा तेरणा व मांजरा नद्या व त्यावरील सर्व बंधारे कोरडीठाक असतानाही जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अल्प पावसावर शेतकऱ्यांनी टोमॅटो, ढोबळी मिरची, साधी मिरची, वांगे, दोडका आदी भाजीपाल्याची लागवड केली़ दरवर्षी मेच्या शेवटच्या आठवड्यात व जूनच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील वडवळ नागनाथ, औराद शहाजानी, निलंगा, औसा, हेर, लातूररोड, निटूर, किल्लारी यासह सीमा भागात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते़ यंदा दुष्काळी परिस्थितीतही भाजीपाल्याची १० कोटी रोपांची लागवड करण्यात आली़ परंतु, पाण्याअभावी व अति तापमानामुळे जवळपास पाच कोटी रोपे करपून गेली आहेत. लातूर जिल्ह्यातील टोमॅटोला उत्तर भारतासह हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड या राज्यात मोठी मागणी असते़ 

तापमान वाढलेलेचगेल्या आठवड्यापासून वाऱ्याचा वेग वाढला असून ताशी १४ कि.मी.ने वारे वाहत आहेत़ मृग संपत आला तरी कमाल व किमान तापमानात म्हणावी तशी घट झाली नाही़ सध्या कमाल तापमान ३७ तर किमान तापमान २९ अंशांवर आहे, असे येथील हवामान केंद्राचे मापक मुक्रम नाईकवाडे यांनी सांगितले़

लागवडीसाठी लाखोंचा खर्चभाजीपाला लागवडीसाठी लाखो रुपयांचा खर्च झाला असल्याचे शेतकरी सुधाकर म्हेत्रे यांनी सांगितले़ पाऊसच न झाल्याने ही रोपे करपली. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाखोंचा खर्च वाया गेला आहे. त्यामुळे परिसरातील बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. 

उत्पन्नात घट होणारदेशात भाजीपाल्याला मागणी वाढली आहे़ पण उत्पादन अल्प आहे़ वेळेवर पाऊस नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे़ जी पिके जगली आहेत, त्यांना सध्याचे तापमान मानणार नाही़ त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होणार असल्याचे व्यापारी मुनीर पटेल यांनी सांगितले़

शेतकऱ्यांकडून दुबार लागवडकाही शेतकऱ्यांनी भाजीपाला रोपाची लागवड केली होती़ परंतु, हवेत बाष्प नसल्याने आणि पाणी नसल्याने ही रोपे करपून केली़ त्यामुळे काहींनी दुबार लागवड केली़ मात्र, पाऊसच नसल्याने तीही करपली असल्याचे औराद येथील नर्सरी चालक सत्यवान मुळे यांनी सांगितले़

चांगल्या उत्पादनाची आशा होती पण...जूनच्या सुरुवातीस भाजीपाल्याची लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळण्याबरोबर भावही मिळतो, या आशेने शेतकऱ्यांनी लागवड केली होती़ शेतकऱ्यांनी केलेला हा सर्व खर्च पाण्यात गेला आहे.  

टॅग्स :agricultureशेतीdroughtदुष्काळFarmerशेतकरी