शेतातील जुगारावर धाड; २५ जणांवर गुन्हा, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 19:04 IST2021-11-19T19:02:36+5:302021-11-19T19:04:11+5:30

रेणापूर तालुक्यातील पानगावनजीकच्या शेतातील गोठ्यात जुगार सुरू होता.

Raids on gambling near pangaon farm; Crime against 25 persons, property worth Rs 6.5 lakh seized | शेतातील जुगारावर धाड; २५ जणांवर गुन्हा, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

शेतातील जुगारावर धाड; २५ जणांवर गुन्हा, साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त

पानगाव (जि. लातूर) : गावालगतच्या शेतातील गोठ्यात सुरू असलेल्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकून ६ लाख ५६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी २५ जणांविरुद्ध रेणापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी झाली आहे.

पोलिसांनी सांगितले, रेणापूर तालुक्यातील पानगावनजीकच्या रमाकांत संपते यांच्या शेतातील गोठ्यात तिर्रट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सायंकाळी धाड टाकण्यात आली. यावेळी जुगाराच्या साहित्यासह ६ लाख ५६ हजारांचे साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी २५ जणांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Raids on gambling near pangaon farm; Crime against 25 persons, property worth Rs 6.5 lakh seized