शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी रुग्णालय, शासकीय वैद्यकीय अधिका-यांनी समन्वयाने काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:19 IST

उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात उदगीर व जळकोट तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा व उपाययोजनासंदर्भात शनिवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. ...

उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात उदगीर व जळकोट तालुक्यातील कोविड स्थितीचा आढावा व उपाययोजनासंदर्भात शनिवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीश हरिदास, तहसीलदार राजेश्वर गोरे, पालिका मुख्याधिकारी राठोड डॉ. पवार, डॉ. देशपांडे, डॉ. प्रशांत चोले, डॉ. माधव चंबुले, सुधीर जगताप, डॉ. बिराजदार, पंचायत समितीचे सभापती प्रा. शिवाजी मुळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, राजेश्वर निटूरे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष कल्याण पाटील, शिवसेनेचे चंद्रकांत टिंगटोल उपस्थित होते.

राज्यमंत्री बनसोडे यांनी मुख्यत: ऑक्सिजन, रेमडेसिविर व कोरोना सेंटर्सबाबत आढावा घेतला. उदगीर व जळकोट तालुक्यातील लॉकडाऊनविषयी माहिती घेऊन येणाऱ्या अडचणींचे निवारण करण्यासंबंधी आवश्यक सूचना केल्या. ऑक्सिजन, रेमडेसिविरबाबत खाजगी आणि शासकीय रुग्णालयांनी चांगले समन्वय ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी तहसीलदारांनी एक विशेष अधिकारी नियुक्त करावा. उदगीरात रुग्णांना बेड उपलब्ध व्हावा म्हणून हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करावा. कोरोना सेंटर्स, हॉस्पिटल्स आणि डेडिकेटेड हॉस्पिटल येथे विद्युत सेवा सुरळीत ठेवावी. फायर ऑडिट करुन घ्यावेत, कोणत्याही कारणास्तव रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी.

समन्वयाबरोबर सुसंवादही ठेवावा...

राज्यमंत्री बनसोडे म्हणाले, कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अविरत काम करणारे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्णांच्या आरोग्य व आयुष्याला प्राधान्य देऊन एकमेकांच्या समन्वयात राहण्याबरोबरच सुसंवाद राखणेही आवश्यक आहे. खाजगी डॉक्टरांनी ऑक्सिजन व रेमडेसिविरबाबत शासनाच्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित आहे. आवश्यक असेल तेव्हांच रुग्णांना या औषधी व ऑक्सिजन देण्यात यावे. खाजगी दवाखान्यात उपलब्ध असलेले ‍रिकामे ऑक्सिजन सिलेंडर त्वरित परत करावे. वाढती रुग्ण्संख्या लक्षात घेता जम्बो सिलेंडर खरेदी करावे, असेही ते म्हणाले.