शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

माहिती दिलेल्या शेतकऱ्यांनाच मिळणार विमा; औसा तालुक्यातील हजाराे शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:21 IST

यंदाच्या खरीप हंगामात बेलकुंडसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टीमुळे काढणीअगोदर व काढणीपश्‍चात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी ...

यंदाच्या खरीप हंगामात बेलकुंडसह परिसरातील बहुतांश गावांमध्ये अतिवृष्टीमुळे काढणीअगोदर व काढणीपश्‍चात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यावेळी तालुक्यातील फक्त १४ हजार पाचशे शेतकऱ्यांचे ऑफलाइन आणि ऑनलाइन पद्धतीने नुकसानीचे अर्ज स्वीकारण्यात आले, तर एकूण १० हजार अर्ज शेतकऱ्यांनी अज्ञानापोटी काही चुकीचे शब्द लिहिल्याने कंपनीकडून बाद ठरवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाने दिली आहे. नुकसानीची माहिती देणाऱ्या शेतकऱ्यांनाच विमा परतावा मिळणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. यापैकी येथील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे पैसे जमा होण्यास प्रारंभ झाला आहे. जे शेतकरी विमा कंपनीला नुकसानीची माहिती देऊ शकले नाहीत, असे शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. कृषी आयुक्तांनी कंपनीला शासकीय यंत्रणांनी केलेले नुकसानीचे पंचनामे ग्राह्य धरून विमा परतावा द्यावा, असा आदेश दिला आहे. असे असतानाही या आदेशाला संबंधित कंपनीने केराची टोपली दाखवली आहे.

विमा कंपनीकडून नियमांची जनजागृती आवश्यक

७२ तासांच्या आत नुकसानीची माहिती देणे बंधनकारक असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे, तर तांत्रिक बाबतीत शेतकऱ्यांना प्रबाेधन करण्याची गरज आहे.