शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ऑटोच्या अपघातात एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

कॉलेजच्या गेटसमोरून दुचाकी चोरीला लातूर : उदगीर शहरातील एका महाविद्यालयासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ टी ५८७१ या क्रमांकाच्या दुचाकीची ...

कॉलेजच्या गेटसमोरून दुचाकी चोरीला

लातूर : उदगीर शहरातील एका महाविद्यालयासमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ टी ५८७१ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत आप्पाराव अण्णाराव सागापुरे (रा. शिरोळ जानापूर, ता. उदगीर, ह.मु. शिवाजीनगर, उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध उदगीर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. चव्हाण करीत आहेत.

तांदुळजा येथे घरासमोरून दुचाकीची चोरी

लातूर : तालुक्यातील तांदुळजा येथे घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच १४ जीजी ७०७१ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत अनंत बळीराम गणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरुड पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.फौ. चौगुले करीत आहेत.

चंदनाची दोन झाडे चोरीला

लातूर : कोष्टगाव शिवारातील फिर्यादीच्या शेतातील दोन चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत प्रदीप व्यंकटराव मुंढे (रा. कोष्टगाव, ता. रेणापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध किनगाव पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. पलमटे करीत आहेत.

स्कुटीची चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

लातूर : लातूर शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाइल शॉपीसमोर पार्किंग केलेल्या एमएच २४ बीबी ४२९८ या क्रमांकाच्या स्कुटीची चोरी झाली. याबाबत आशिष विजय राठोड (रा. लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. भताने करीत आहेत.

दुचाकीला धडक; एकजण जखमी

लातूर : बुधोडा ते लातूरकडे येत असताना श्रीराम फायनान्स समोरून येणाऱ्या एका दुचाकीने फिर्यादीच्या स्कुटीला धडक दिली. यात फिर्यादी व फिर्यादीचा मित्र जखमी झाला. याबाबत युसुफ मुसा पटेल (रा. इस्लामपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औसा पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. कांबळे करीत आहेत.

दोन बैलजोडीची चोरी; गुन्हा दाखल

लातूर : निलंगा तालुक्यातील हलगरा शिवारातील शेडमध्ये बांधलेल्या दोन बैलजोडीची चोरी झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. या बैलजोडीची किंमत १ लाख २० हजार रुपये आहे. याबाबत फारुख अहेमद अब्दुल खादर देशमुख (रा. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून औराद शहाजानी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.ना. सौदागर करीत आहेत.

शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण

लातूर : तू जास्त शहाणपणा करतोस का म्हणून शिवीगाळ करून लाथा-बुक्क्याने मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नेलवाड येथे घडली. याबाबत शफिउल्ला पाशासाहेब उहागीरदार (रा. नेलवाड, ता. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दशरू अण्णाराव गुंजले यांच्याविरुद्ध कासारशिरसी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पो.हे.कॉ. सिरसाट करीत आहेत.