शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

६५१ उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याच्या नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:22 IST

अहमदपूर : ग्रामपंचायत निवडणुकीपाठोपाठ सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाली आहे. गावांना नवीन कारभाऱ्याचे वेध लागले आहेत तर नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या ...

अहमदपूर : ग्रामपंचायत निवडणुकीपाठोपाठ सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत झाली आहे. गावांना नवीन कारभाऱ्याचे वेध लागले आहेत तर नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या सर्व उमेदवारांनी तात्काळ निवडणूक खर्च सादर करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. तालुक्यातील ७०९ पैकी ६५१ जणांनी अद्यापही हे विवरण सादर केले नाही.

तालुक्‍यातील ४९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ७०९ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यातील काही उमेदवारांनी आपला खर्च वेळेत सादर केला आहे. मात्र, ६५१ उमेदवारांनी अद्यापही खर्च सादर केला नाही. त्यामुळे एक महिन्याच्या मुदतीत खर्च सादर न केल्यास पुढील सहा वर्षे निवडणूक लढविण्यावर बंदीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना आता खर्च सादर करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. त्यासाठी अँड्रॉइड मोबाईल गरजेचा आहे. अगोदर ऑनलाईन अर्ज सादर करून त्याची प्रिंट काढून त्यानंतर उपकोषागार कार्यालयाकडे ऑफलाईन खर्च सादर करावा लागणार असल्यामुळे अनेक उमेदवारांची फरफट सुरू झाली आहे.

उमेदवारांपुढे अडचणी...

उमेदवाराजवळ अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे आहे. एका मोबाईलवर एकाच व्यक्तीचा खर्च सादर करता येतो. मोबाईलमध्ये वॉटर ॲप डाऊनलोड करणे गरजेचे आहे. नामनिर्देशनपत्र दाखल केले असेल तरच ॲप डाऊनलोड होते. ॲपविषयी उमेदवारांना ज्ञान नाही. नेटवर्कमुळे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अडचणी येत आहेत.

ऑफलाईनला परवानगी द्या...

ऑनलाईन अर्ज दाखल करून त्याच्या प्रिंट काढल्याशिवाय ऑफलाईन दाखल होत नाही. त्यासाठी थेट ऑफलाईनला परवानगी दिल्यास सर्वच उमेदवारांची अडचण दूर होणार आहे. त्यामुळे वेळही वाचणार असल्याचे आनंदवाडीचे नूतन सदस्य त्र्यंबक घोगरे यांनी सांगितले.

एक महिन्याचा कालावधी...

निवडणूक निकाल लागल्यापासून एक महिन्याच्या आत म्हणजे १७ फेब्रुवारीपर्यंत संबंधितांनी खर्च उपकोषागार कार्यालयाकडे दाखल करणे गरजेचे आहे, असे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले.

वेळेत खर्च नसल्यास निलंबनाचा प्रस्ताव...

जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार एक महिन्याच्या आत संबंधित विजयी व पराभूत उमेदवारांनी खर्च सादर करणे गरजेचे आहे. असे न केल्यास यासंबंधी निलंबनाचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल व त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे यांनी सांगितले.