शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
2
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
3
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
4
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
5
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
6
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
7
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
8
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
9
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
10
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
11
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
12
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
13
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
14
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
15
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
16
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
17
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
18
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
19
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
20
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
Daily Top 2Weekly Top 5

NEET Paper Leak Case: लातूरमधून निवृत्त प्राध्यापक सीबीआयच्या ताब्यात; पुणे कनेक्शन उघड, तपासाला वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 13:18 IST

पेपर सेटिंगमधील विषयतज्ज्ञ सीबीआयच्या रडारवर; लातूरच्या घरातून निवृत्त प्राध्यापक उचलले!

लातूर : नीट पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआयच्या पथकाने पुणे तसेच लातूर येथे वास्तव्याला असलेले सेवानिवृत्त प्रा. पी.व्ही. कुलकर्णी यांना गुरुवारी लातूरच्या घरातून ताब्यात घेतले. दरम्यान, प्राथमिक चौकशी केल्यानंतर पथक निवृत्त प्राध्यापकास सोबत घेऊन पुण्याकडे रवाना झाले आहे. या संपूर्ण कारवाईत स्थानिक पोलिस सोबत होते, मात्र त्यांनी गोपनीयता ठेवत कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, पुणे येथून कारवाईचे सूत्र हलत असल्याची खबर शैक्षणिक क्षेत्रात चर्चिली जात होती.

गुरुवारी पहाटेच सीबीआयचे पथक लातुरात धडकले होते. त्यांनी निवृत्त प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी यांच्या लातूर येथील पद्मावती नगर येथील निवासस्थानी जाऊन चौकशी सुरू आहे. त्यांचे पुणे येथेही घर असून, चौकशीत नेमकी कोणती माहिती हाती आली, याची स्पष्टता झालेली नाही. सीबीआय पथक तसेच पोलिसांकडून शेवटपर्यंत गोपनीयता पाळण्यात आली.

पेपर सेटिंग प्रक्रियेत सहभाग?
प्रा.पी.व्ही. कुलकर्णी हे केमिस्ट्री विषयतज्ज्ञ असून, त्यांचा नीट पेपर सेटिंग प्रक्रियेत सहभाग होता, अशी माहिती शिक्षण क्षेत्रात चर्चिली जात आहे. परंतु, त्याला तपास यंत्रणांनी अद्यापि दुजोरा दिला नसला तरी पथकाने दुपारपर्यंत चौकशी केली आणि त्यानंतर पथक त्यांना सोबत घेऊन पुण्याला गेल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दोन्ही प्रकरणे वेगवेगळी
आधीपासूनच प्रश्न जुळल्याच्या प्रकरणात कोचिंग क्लासच्या दिशेने सुरू असलेला स्थानिक पोलिसांचा तपास आणि सीबीआय यंत्रणेने शोध घेतलेले निवृत्त प्राध्यापकाचे प्रकरण हे दोन्ही वेगवेगळे असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, स्थानिक पोलिसांनी अद्यापपर्यंत समुपदेशक, विद्यार्थी, पालक आणि कोचिंग क्लासेसमधील व्यक्ती अशा एकूण सहा जणांची चौकशी करून जबाब घेतले आहेत. त्यात मिळालेल्या माहितीची गुरुवारीही पडताळणी सुरू होती. नव्याने कोणाचेही जबाब घेण्यात आलेले नाहीत. याशिवाय, सीबीआय कारवाईच्या तपशिलाबाबत भाष्य करू शकत नाही, असे वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Paper Leak: Retired Professor Detained; Pune Link Emerges.

Web Summary : CBI arrested retired Professor Kulkarni from Latur in the NEET paper leak. A Pune connection is suspected. He is a chemistry expert, possibly involved in paper setting. Separate local police investigations continue.
टॅग्स :NEET Exam Paper Leakनीट परीक्षा पेपर लीकlaturलातूरCrime Newsगुन्हेगारी