लातूर : नीट प्रकरणात शुक्रवारी सीबीआयच्या पथकाने एका कोचिंग क्लास चालकाची निवासस्थानी जाऊन चौकशी केली. बंद दाराआड झालेल्या चौकशीतील तपशील समजू शकला नाही. दरम्यान, सायंकाळी पथक पुण्याच्या दिशेने रवाना झाले. सकाळी ८ वाजता आलेले पथक सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवासस्थानी होते. दरम्यान, त्यांनी कोचिंग क्लासवरही जाऊन माहिती घेतली. निवृत्त प्रा. पी.व्ही. कुलकर्णी यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सीबीआय पथक शहरात असल्याने चर्चेला उधाण आले.
चौकशीत काय घडले?
पीडीएफ प्रश्नसंच आणि परीक्षेतील समसमान प्रश्न तसेच सीबीआयकडे प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आल्याचे कळते. दरम्यान, कोचिंग क्लासमधील सूत्रांनी सांगितले, चौकशी झाली. त्यांना जी माहिती हवी ती आम्ही दिली आहे. ती ते घेऊन परतले.
लातुरात काय घडले
३ मे रोजी ‘नीट’ची परीक्षा झाल्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेपरफुटीच्या संदर्भाने कारवाईचे सत्र सुरू असताना लातुरातील एका विद्यार्थिनीच्या पालकाने संचातील प्रश्न आणि नीट परीक्षेतील प्रश्न समान असल्याचा मुद्दा समोर करून तक्रार केली होती. त्यात सहाजणांची चौकशी झाली. विद्यार्थी, पालक, समुपदेशक यांच्या जबाबानंतर सोशल माध्यमातून तो प्रश्नसंच आमच्याकडे फॉरवर्ड झाला. तो आम्ही नातेवाईक, विद्यार्थी तसेच काही व्यक्तींना पुढे पाठवला, असे जबाब स्थानिक पोलिसांच्या समोर आल्याची माहिती आहे.
अनेकांकडे १ मे पासूनच प्रश्नसंच
३ मे रोजी परीक्षा झाली; परंतु १ मे पासूनच टेलिग्राम, व्हॉटस्ॲपच्या माध्यमातून प्रश्नसंचाची पीडीएफ काही विद्यार्थी, समुपदेशक, पालक आणि काही खासगी व्यक्तींकडे होती. पेपर फुटल्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्नसंचाच्या रूपाने नीट परीक्षेचे प्रश्न काहीजणांपर्यंत पोहोचले. त्यास कोणी गेस पेपर म्हटले, संभाव्य प्रश्न, मॉक टेस्ट तर कोणी आमच्या क्वेश्चन बँकमधील प्रश्न आले, असे म्हटले. त्यामुळे लातुरातील चौकशीचे गुऱ्हाळ शेवटच्या लाभार्थ्याचे आहे की, पेपर फुटीच्या कनेक्शनशी त्याचा काही संबंध आहे, याचा उलगडा तपासानंतरच होणार आहे.
Web Summary : CBI questioned a Latur coaching class owner regarding NEET paper leak allegations. A complaint alleged exam questions matched a leaked PDF. Authorities are investigating the source and distribution of the question set before the exam.
Web Summary : सीबीआई ने नीट पेपर लीक मामले में लातूर के एक कोचिंग संचालक से पूछताछ की। एक शिकायत में परीक्षा के प्रश्नों और लीक हुए पीडीएफ के प्रश्नों के समान होने का आरोप लगाया गया है। अधिकारी परीक्षा से पहले प्रश्न सेट के स्रोत और वितरण की जांच कर रहे हैं।