जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणाला आले तळ्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST2021-09-08T04:25:38+5:302021-09-08T04:25:38+5:30

किनगाव-गंगाखेड जाणाऱ्या राज्य मार्गावरील नदीवर असलेल्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने तीन-चार तास वाहतूक खोळंबली होती. तसेच ...

The nature of the pond came to the Zilla Parishad school premises | जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणाला आले तळ्याचे स्वरूप

जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणाला आले तळ्याचे स्वरूप

किनगाव-गंगाखेड जाणाऱ्या राज्य मार्गावरील नदीवर असलेल्या पुलावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने तीन-चार तास वाहतूक खोळंबली होती. तसेच खानापूर गावजवळील मन्याड नदीचे पात्र दुथडी भरून वाहत असल्याने खानापूरमधील काही घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. किनगाव ते लातूर जाणारा राज्यमार्ग मन्याड नदीवरील कमी उंचीच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सायंकाळपर्यंत वाहतूक बंद होती . तसेच रेणापूर तालुक्यातील माकेगाव येथेही पावसाचे पाणी व गावाच्यावर असलेल्या तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचे पाणी गावात, घरात शिरल्याने अनेक घरातील संसार पाण्यात भिजून नुकसान झाले आहे.

I ) किनगाव गंगाखेड राज्य मार्गवर असलेल्या पुलावर पाणी वेगाने वाहत असल्याने वाहतूक बराच वेळ बंद होती.

२ ) लातूर किनगाव मार्गावर असलेल्या मन्याड नदीला पूर आल्याने नदीवरील पूलवरून पाणी वेगाने वाहत असल्याने वाहतूक बंद होती.

३ ) किनगाव येथील प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये पाणी साचल्याने तळ्याचे रूप आले होते.

Web Title: The nature of the pond came to the Zilla Parishad school premises