शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दाेन महिन्यात १४ ‘माेस्ट वाॅण्टेड’ आराेपींना ठाेकल्या बेड्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

विविध गंभीर गुन्ह्यामध्ये पाेलिसांच्या रेकाॅर्डवर असणाऱ्या आराेपींची नावे माेस्ट वाॅण्टेड यादीतून कमी करण्यासाठी लातूर पाेलिसांनी विशेष माेहीम हाती घेतली ...

विविध गंभीर गुन्ह्यामध्ये पाेलिसांच्या रेकाॅर्डवर असणाऱ्या आराेपींची नावे माेस्ट वाॅण्टेड यादीतून कमी करण्यासाठी लातूर पाेलिसांनी विशेष माेहीम हाती घेतली आहे. उर्वरित फरार असलेल्या आराेपींचा शाेध पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या पथकाकडून घेतला जात आहे. लातूर जिल्ह्यातील २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांच्या आकडेवारीवरून घडलेल्या गुन्ह्यांमधील जुलै ते ऑगस्ट २०२१ अखेरपर्यंत पाेलिसांना पाहिजे असलेल्या गुन्हेगारांपैकी १४ जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. विशेष पथकाने शाेध घेत यातील १४ वाॅण्टेड आराेपींना पकडत गुन्ह्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याकडून काही प्रमाणात मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. या माेहिमेसाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेही याेगदान दिले आहे.

फरार आराेपींची अभिलेखावरील संख्या कमी करण्यासाठी विशेष शाेध माेहीम उघडण्यात आली आहे. या माेहिमेसाठी सात पाेलीस उपविभागातील विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली असल्याची माहिती पाेलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिली. गुन्ह्याच्या तपासाकामी फरार असणाऱ्या आराेपींचा अधिक फायदा हाेताे. त्या अनुषंगाने पाेलीस अधीक्षक पिंगळे यांनी लातूर जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आराेपींना अटक करण्याचे आदेश पथकांना दिले आहेत. त्यानुसार ही कारवाइची माेहीम हाती घेण्यात आली आहे. पाेलीस पथक उर्वरित फरार आराेपींचा शाेध घेत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

पाेलिसांना करावा लागताे अडचणींचा सामाना...

एखाद्या गुन्ह्यात फरार असलेल्या आराेपींचा शाेध घेण्यासाठी अनेक अडचणींना सामाेरे जावे लागते. सर्वाेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आराेपींना शाेधताना आधार कार्डाची माहिती गाेपनीय असल्याने ती पाेलिसांना मिळविता येत नाही. याचा फायदा घेत अनेक आराेपी नाव बदलून राहतात अथवा परराज्यात पळून जातात. परिणामी, त्यांच्या शाेधकार्यात अनेक अडथळे येतात. मात्र, अशा अडचणींवर मात करत पाेलीस वाॅण्टेड आराेपींचा शाेध घेत मुसक्या आवळत आहेत. हे विशेष..!

चाेरी, मारामारीसह इतर गंभीर गुन्हे दाखल...

लातूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत पाकीटमार, हाणामारीपासून ते बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, घरफाेडी, दुचाकी चाेरी, सार्वजिनक ठिकाणी गाेंधळ घालून दहशत निर्माण करणे, प्राणघातक हल्ला करणे, फसवणूक करणे, विनयभंग करणे, अपघात करून फरार हाेणे, काळाबाजार करणे, खून करून फरार हाेणे यासारख्या गंभीर गुन्ह्यात गत पाच ते दहा वर्षांपासून फरार असलेल्या आराेपींचा अटक करण्यात आलेल्यामध्ये समावेश आहे.

आराेपींच्या शाेधासाठी विशेष पथके

पाेलिसांच्या रेकाॅर्डवर फरार असलेल्या आराेपींच्या शाेधासाठी विशेष पथकासह स्थानिक गुन्हे शाखेची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकामध्ये एक पाेलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यांच्या दिमतीला सायबरसेलही आहे. परराज्यासह इतर जिल्ह्यातील फरार आराेपींना अटक करण्यासाठी ही पथके रवाना केली जातात.

परजिल्ह्यासह राज्यातील गुन्हेगारांचा समावेश...

अनेक प्रकरणांमध्ये आराेपींनी तुरुंगाची शिक्षा भाेगल्यानंतर पुन्हा गुन्हे केल्यास समाेर आले आहे. स्थानिक फारार आणि पाहिजे असलेल्या आराेपीच्या संख्येत स्थानिक आराेपींचे अल्प प्रमाण आहे. तर परराज्यातील आणि जिल्ह्यातील आराेपींची संख्या अधिक आहे.