रेणापुरात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:24 IST2021-02-25T04:24:24+5:302021-02-25T04:24:24+5:30

रेणापूर : संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुका समिती सदस्यांची बैठक बुधवारी झाली. या समितीचे नूतन अध्यक्ष गोविंद पाटील ...

Meeting of Sanjay Gandhi Niradhar Anudaan Yojana Samiti in Renapur | रेणापुरात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक

रेणापुरात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक

रेणापूर : संजय गांधी निराधार अनुदान योजना तालुका समिती सदस्यांची बैठक बुधवारी झाली. या समितीचे नूतन अध्यक्ष गोविंद पाटील यांच्यावतीने बुधवारी सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. गोविंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी समितीच्या सदस्यांची बैठक झाली. या बैठकीला उपस्थित असलेल्या समितीच्या नूतन सदस्यांचा सत्कार करण्यात आला. रेणापूर तालुक्यात गत दोन वर्षांपासून शेकडो लाभार्थ्यांनी अनुदानासाठी तहसील कार्यालयाकडे अर्ज सादर केले हाेते. या अर्जांच्या मंजुरीसाठी तातडीने बैठक घ्यावी, तालुक्यात एकही पात्र लाभार्थी संगांयो योजनेपासून वंचित राहणार नाही, याविषयी बैठकीत चर्चा करण्यात आली.

यावेळी समितीचे सदस्य रुपेश चक्रे, बाळकृष्ण माने, ॲड. प्रशांत आकनगीरे, ॲड. शेषेराव हाके, अंगद साळुंके, व्यंकट पाटील, डॉ. उमाकांत देशमुख, कुलदीप सूर्यवंशी, विठ्ठल कटके, रफिक शिकलकर, प्रा. सिद्धार्थ चव्हाण यांचाही गोविंद पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अशोक शेळके, गणेश कलाल, रज्जाक शेख उपस्थित होते.

Web Title: Meeting of Sanjay Gandhi Niradhar Anudaan Yojana Samiti in Renapur