शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले हे कृतिशील समाजसुधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:59 IST

लातूर : एकोणिसाव्या शतकातील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांचे विचार आणि आचरण यामध्ये ...

लातूर : एकोणिसाव्या शतकातील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हे कृतिशील समाजसुधारक होते. त्यांचे विचार आणि आचरण यामध्ये एकवाक्यता दिसून येते. त्यामुळेच त्यांना सेंद्रीय विचारवंत म्हणून संबोधले जाते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुशीला पिंपळे यांनी येथे केले.

सावित्रीबाई फुले यांच्या १९० व्या जयंतीनिमित्त नारी प्रबोधन मंच, लातूर आयोजित ‘ज्योतिर्मय सावित्री : एक समताधिष्ठित सहजीवन’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. भास्कर बडे, डॉ. अजित जगताप, सुनंदा जगताप, नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्षा सुमती जगताप, लेखिका अरुणा दिवेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रा. पिंपळे म्हणाल्या, पुस्तकात समतेच्या संकल्पना अगदी सुस्पष्ट आहेत. खूप मोठ्या ग्रंथ संग्रहातून त्या नेमकेपणाने मांडल्या आहेत. या पुस्तकाचा आशय कुठेही ढळणार नाही, याची काळजी लेखिका दिवेगावकर यांनी घेतली आहे. तसेच ज्योतिबा आणि सावित्री यांचे समताधिष्ठित सहजीवन शोधण्याचा व्यापक प्रयत्न केला आहे. प्रा. बडे म्हणाले, ‘सावित्री आणि ज्योतिबा यांचे १९ व्या शतकातील आधुनिक विचार आजही पचवणे हे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी लोकशाही मूल्यांशी समर्पित राहावे लागते. या कार्यक्रमात प्रारंभी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जोडप्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला लातूर वृक्ष चळवळ, मराठा साहित्य संस्कृती मंडळातील सदस्य, साहित्यिक, कथाकार, लेखक, कवी उपस्थित होते. प्रास्ताविक मयुरी सामंत, डॉ. अनिल जायभाये यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पंचशील डावकर यांनी केले तर प्रा. नयन राजमाने यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रतिभा गोमसाळे, राधाकृष्ण देशमुख, सुनंदा जगताप, राहुल लोंढे, सुधाकर बुरगे, तारा लहाने, अखिलेश आयलाने, भीमराव गाडेराव, आम्रपाली बनसोडे यांनी परिश्रम घेतले.

कॅप्शन : लेखिका अरुणा दिवेगावकर लिखित ‘ज्योतिर्मय सावित्री : एक समताधिष्ठित सहजीवन’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना साहित्यिक प्रा. डॉ. भास्कर बडे, डॉ. अजित जगताप, सुनंदा जगताप, नारी प्रबोधन मंचच्या अध्यक्षा सुमती जगताप.