शहरं
Join us  
Trending Stories
1
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
2
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
3
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
4
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
5
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
6
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
7
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
8
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
9
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
10
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
11
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
12
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
13
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
14
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
15
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
16
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
17
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
18
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
19
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
20
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य जलवाहिनीच्या व्हॉल्वला गळती, चाकुरला अशुध्द पाणीपुरवठा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:14 IST

चाकूर : शहराला पाणीपुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वला लिकेज असल्याने त्यात गटारीचे घाण पाणी जात आहे. परिणामी, शहरास अशुध्द ...

चाकूर : शहराला पाणीपुरवठा करणा-या मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वला लिकेज असल्याने त्यात गटारीचे घाण पाणी जात आहे. परिणामी, शहरास अशुध्द पाणीपुरवठा होत आहे. ही समस्या नगरपंचायतीच्या निदर्शनास आणून देऊनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे रोगराई वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे प्रत्येकाला धास्ती वाढली आहे. अशा परिस्थितीत चाकुरात नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. चाकूर शहराला बोथी येथील पाझर तलावातून पाणी पुरवठा होतो. त्यासाठी बोथी ते चाकूर अशी मुख्य जलवाहिनी आहे. त्यावर अनेक ठिकाणी व्हॉल्व बसविण्यात आले आहेत. त्यापैकी काही ठिकाणच्या व्हॉल्वला गळती लागली आहे. त्यातून पाण्याची नासाडी होत आहे. परंतु शहरानजिक असलेल्या एका व्हॉल्वला अधिक गळती असून ज्यावेळी पाणीपुरवठा होत असतो, तेव्हा त्या व्हॉल्वमधून पाण्याचे फवारे उडून पाण्याची नासाडी होते.

जेव्हा पाणीपुरवठा बंद होतो, तेव्हा या व्हॉल्वमध्ये बाजूस असलेल्या गटारीतील पाणी जाते. पाणीपुरवठा सुरु झाल्यानंतर ते पुढे पाण्याच्या टाकीतून अशुध्द पाणी जाते. त्यानंतर जलकुंभातून शहरातील नागरिकांना जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा होतो. पाण्याच्या टाक्याही अस्वच्छ आहेत. टाकीत उतरण्यासाठी असलेली लोखंडी सिडी कुजली आहे. नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे शहरवासियांना अशुध्द पाणी प्यावे लागत आहे. त्यातून विविध आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

ही समस्या अनेकदा संबंधित पाणीपुरवठा विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. मनसेने मुख्याधिका-यांना घेऊन स्पॉट पंचनामाही केला होता. तेव्हा मुख्याधिका-यांनी आठ दिवसांत या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

मनसेकडून स्पॉट पंचनामा...

चाकुरातील अशुध्द पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत स्पॉट पंचनामा करुन आंदोलनही केले होते. तेव्हा ही समस्या लवकरच सोडविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले. परंतु, अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही. ही समस्या सोडवावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केली आहे.

संबंधितावर कार्यवाही करावी...

अशुध्द पाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती आहे. नगरपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. संबंधित अधिका-यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी लक्ष्मण धोंडगे यांनी केली.

अधिका-यांना बाटली बंद पाणी...

शासकीय अधिकारी कार्यालयात बाटली बंद पाणी पितात. त्यामुळे त्यांना जनतेच्या पाणी प्रश्नाचे काही देणे- घेणे नाही. या गंभीर समस्यांकडे दुर्लक्ष करणा-यांवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी अल्ताभ हरणमारे यांनी केली.

लवकरच दुरुस्ती...

मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्वची लवकरच दुरुस्ती करण्यात येईल. त्यासंबंधी संबंधित अधिकारी व कर्मचा-यांना सूचना केल्या जातील, असे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी सांगितले.