-रामकिशन भंडारेलातूर : राज्याचे शैक्षणिक केंद्र असलेल्या लातूरच्या लौकिकात मोठी भर पडत असून, १७२ कोटींचे प्रशस्त व अत्याधुनिक सुविधा असलेले ‘सारथी’चे विभागीय संकुल आकाराला येत आहे. बारा मजली दोन स्वतंत्र वसतिगृहांसह ग्रंथालय आणि अभ्यासिकांचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन महिन्यांत ही वास्तू विद्यार्थ्यांच्या सेवेत रुजू होणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरबरोबरच लातूरमध्ये हे संकुल सुरू होत असल्याने मराठवाड्यातील लक्ष्यित गटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक उन्नतीला मोठी चालना मिळणार आहे.
मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) कार्यरत असून, राज्यभर विभागीय कार्यालये व अत्याधुनिक वसतिगृहे उभारण्यात येत आहेत. लातूरमध्ये बार्शी रोडवरील वरवंटी येथील महिला आयटीआयच्या १.६० हेक्टर जागेवर सुसज्ज विभागीय कार्यालयाचे बांधकाम सुरू असून, याचे काम २०२४-२५ मध्ये सुरू झाले आहे. राज्य शासनाने या प्रकल्पासाठी १७२.८६ कोटींच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून, आतापर्यंत १०१ कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे.
१२ मजली दोन स्वतंत्र वसतिगृहेमुले आणि मुलींसाठी स्वतंत्र १२ मजल्यांची दोन वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. एका वसतिगृहात ५०० याप्रमाणे एकूण एक हजार विद्यार्थ्यांच्या निवासाची सोय येथे होणार आहे. प्रत्येक रूममध्ये स्वतंत्र ४ बेड, कपाट, अभ्यासाचे टेबल आणि प्रसाधनगृहाची सुविधा देण्यात आली आहे.
वसतिगृहात पंचतारांकित सुविधा१२ मजली वसतिगृहात ठराविक मजल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक जीम, मेडिटेशन रूम, वैद्यकीय कक्ष, टीव्ही रूम आणि इनडोअर गेमिंग रूम, किचन, लॉन्ड्री आणि ॲक्टिव्हिटी सभागृहांचे नियोजन करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षार्थींसाठी ‘स्मार्ट’ लायब्ररीएकाचवेळी ३६४ विद्यार्थी बसून अभ्यास करू शकतील, अशी सुसज्ज हायटेक अभ्यासिका आणि ग्रंथालय येथे उभारले जात आहे. विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र मोठे ऊर्जास्थान ठरणार आहे.
चार जिल्ह्यांचे प्रशासकीय मुख्यालयलातूर येथील हे विभागीय कार्यालय लातूर, धाराशिव, परभणी आणि बीड अशा चार जिल्ह्यांसाठी मुख्य केंद्र म्हणून काम करेल. या इमारतीमध्ये अधिकारी-कर्मचारी कक्ष, व्हीसी मिटिंग रूम आणि कॉन्फरन्स हॉलचे काम सध्या सुरू आहे. एमपीएससी, यूपीएससी पूर्व प्रशिक्षण, उच्च शिक्षण शिष्यवृत्ती आणि कौशल्य विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी या कार्यालयाकडून होईल, अशी आशा आहे.
Web Summary : A ₹172 crore 'SARATHI' complex is nearing completion in Latur. Featuring hostels, a library, and study spaces, it will benefit Marathwada students. The facility will serve as a hub for four districts, offering training and scholarship opportunities, fostering educational and economic growth.
Web Summary : लातूर में 172 करोड़ रुपये का 'सारथी' परिसर बनकर तैयार हो रहा है। छात्रावासों, पुस्तकालय और अध्ययन स्थानों से युक्त, इससे मराठवाड़ा के छात्रों को लाभ होगा। यह सुविधा चार जिलों के लिए केंद्र के रूप में काम करेगी, प्रशिक्षण और छात्रवृत्ति के अवसर प्रदान करेगी, जिससे शैक्षिक और आर्थिक विकास को बढ़ावा मिलेगा।