Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 16:25 IST2025-11-13T16:24:17+5:302025-11-13T16:25:20+5:30
Latur Crime News: तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अश्लील व्हिडीओ बघितला. त्यानंतर जे घडलं, त्याने शाळेतील शिक्षक आणि पालकही हादरून गेले आहेत.

Latur: अश्लील व्हिडीओ आणि तिसरीतील विद्यार्थ्याने वर्गमित्रासोबतच अनैसर्गिक...; लातुरमधील शाळेतील घटना
आता मोबाईल आवश्यक गरजेपेक्षा व्यसन बनू लागले आहे. लहान मुलेही मोबाईलच्या आहारी गेली आहेत. मोबाईलच्या स्क्रीन ही मुले काय काय बघतात, याकडे पालक प्रत्येकवेळी लक्ष ठेवू शकत नाही आणि त्यातूनच अनेक वाईट घटनाही घडत आहेत. पण, लातूरमध्ये जी घटना घडली आहे, ती पालकांची चिंता वाढवणारी आहे. तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अश्लील व्हिडीओ बघून धक्कादायक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थ्याने वर्गमित्रावरच अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
लातूर शहराजवळ असलेल्या एका सरकारी शाळेतच ही घटना घडली आहे. तिसरीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर एक अश्लील व्हिडीओ बघितला. शाळेतील वर्गात तो होता. वर्गमित्रावरच त्याने अनैसर्गिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
ही घटना जेव्हा शिक्षकांना कळली, तेव्हा तेही हादरून गेले. विद्यार्थ्याची विचारपूस केल्यानंतर त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ बघितल्याचे आणि ते बघून असे करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले. या घटनेने शाळेत खळबळ उडाली. शिक्षक आणि पालकांनीही धक्का बसला.