शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

लातूरमध्ये निवडणुकीत आघाडी, महापौर-उपमहापौर पदाच्या निवडीत काँग्रेस-वंचित आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:00 IST

राष्ट्रवादीनंतर आता भाजपही वंचित बहुजन आघाडीला पाठबळ देण्याच्या तयारीत

लातूर : महापालिका निवडणुकीपूर्वी एकत्र लढलेले काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी आता महापौर व उपमहापौर निवडीच्या रिंगणात एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याचे चित्र समोर आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी, दोन्ही पक्षांनी आपले स्वतंत्र उमेदवार रिंगणात उतरवल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. त्यातच स्वत: अर्ज दाखल न करता राष्ट्रवादी आणि भाजपने वंचितला पाठिंबा देण्याची तयारी दर्शविल्याने महापौर, उपमहापौर पदाच्या निवडीचे राजकारण रंगणार आहे.

सभागृहात भाजपकडे २२ नगरसेवक असूनही त्यांनी घेतलेली ही भूमिका अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे. माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी वंचितचा उमेदवार महापौर, उपमहापौर निवडणुकीत कायम राहिला तर भाजपचा वंचितला पाठिंबा राहील, असे म्हटले आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव नगरसेवकानेही ‘वंचित’ला पाठिंबा जाहीर केला आहे.

उमेदवारी अर्जांचे गणित..!९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांनी कंबर कसली आहे.काँग्रेसकडून : महापौरपदासाठी जयश्री सोनकांबळे आणि उपमहापौर पदासाठी ॲड. स्नेहल उटगे यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत.वंचित बहुजन आघाडीकडून : महापौरपदासाठी निकिता सोमवंशी आणि उपमहापौरपदासाठी सचिन गायकवाड मैदानात आहेत.

सभागृहातील बलाबल...!लातूर महापालिकेत सत्तेच्या चाव्या सध्या काँग्रेसच्या हातात सुरक्षित दिसत आहेत, मात्र मित्रपक्षाने दिलेले 

आव्हान लक्षवेधी आहे :काँग्रेस : ४३भाजप : २२वंचित बहुजन आघाडी : ०४राष्ट्रवादी काँग्रेस : ०१

निवडणुकीची प्रक्रिया आणि पेच..!९ फेब्रुवारी रोजी सकाळी अर्जांची छाननी केली जाईल. त्यानंतर उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी अवघ्या अर्ध्या तासाचा अवधी दिला जाणार आहे. या अर्ध्या तासात नेमकी काय ‘राजकीय खलबते’ होतात, यावर संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे. जर अर्ज मागे घेतले नाही, तर हात वर करून मतदान प्रक्रियेद्वारे नवीन महापौर आणि उपमहापौरांची निवड केली जाईल.

मैत्री की लढत..?निवडणुकीपूर्वी हातात हात घालून चालणारे हे दोन पक्ष सत्तेच्या वाटणीत मात्र ‘आमने-सामने’ आले आहेत. हा केवळ एक दबावतंत्राचा भाग आहे की खरोखरच या दोन्ही पक्षांची युती संपुष्टात आली आहे, याचे उत्तर ९ फेब्रुवारीलाच मिळेल. काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत असल्याने त्यांचे पारडे जड असले, तरी ‘वंचित’ने दिलेले आव्हान अन् भाजप, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची उडी निवडीत रंग भरणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Election: Congress and VBA face-off for Mayor, Deputy Mayor posts.

Web Summary : In Latur, Congress and VBA, former allies, compete for Mayor/Deputy Mayor. BJP, NCP back VBA, spicing up the election. Congress holds majority but faces a challenge.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीcongressकाँग्रेस