शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
2
तेल संकटातून दिलासा मिळणार? अमेरिकेने रशियन तेलावरील सूट वाढवली; भारताला कसा होणार फायदा?
3
Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये
4
भारताच्या 'या' शेजारी देशात गरिबीचा हाहाकार! ४७ लाख लोक उपासमारीच्या छायेत, मुलं विकण्याची आली वेळ!
5
विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप
6
एकाच महिलेचे ४ प्रियकर; सुपारी देऊनही नवरा वाचला, उशीने तोंड दाबून बेडवरच संपवला! ऐकून अंगावर येईल काटा
7
NEETच्या नावाखाली लाखोंचा खेळ! RCC क्लासमध्ये प्रवेशासाठी किती फी? मोटेगावकरच्या कमाईचे धक्कादायक आकडे समोर
8
'तेरे नाम'मधली निर्जरा आजही दिसते सुंदर, २५ वर्षांचा अनुभव केला शेअर; पण कुठे कमी पडली?
9
अमेरिकेची दादागिरी चालणार नाही; भारत रशियाकडून तेल खरेदी करणारच, सरकारचा स्पष्ट संदेश
10
सेल्फी, लॅप ऑफ ऑनर आणि MS धोनी-रैना जोडीची खास भेट; चेपॉकवरील भावूक क्षण (VIDEO)
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी पुन्हा विध्वंसाची भाषा; म्हणाले, "चर्चा यशस्वी झाली नाही, तर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला करू"
12
शिवराज मोटेगावकरच्या अटकेनंतर ‘सीबीआय’चा महाराष्ट्रातील मुक्काम वाढला, तपासणी सत्र सुरूच!
13
समुद्रात दादागिरी! इराणने 'होर्मुझ स्ट्रेट'वर लागू केला स्वतःचा कायदा; एका जहाजाकडून वसूल करताहेत 'इतके' कोटी
14
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
15
"माझ्या शांततेला कमजोरी समजू नका, मी लवकरच परतणार!" शेख हसीना यांचा बांगलादेशला थेट इशारा
16
माणुसकी उरली नाही! भररस्त्यात जोडप्याला बांबूने बेदम मारहाण अन् आजूबाजूला बघ्यांची गर्दी, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ
17
अधिक मास २०२६: अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी का भरावी? सविस्तर वाचा
18
मधुचंद्राच्या रात्री असं काय घडलं की नवरदेवाने दुसऱ्याच दिवशी आयुष्य संपवलं? नवरीसह ४ जणांवर गुन्हा दाखल!
19
२७ एप्रिललाच नीटचा लीक पेपर नाशिकमध्ये पोहोचला, मिळताच शुभम दोन दिवस नाशिकमधून बाहेर
20
San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Latur: ‘रोहयो’तील कुशल मजुरीचे १७४ कोटी रखडले; हजारो शेतकरी लाभार्थी आर्थिक कोंडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 17:00 IST

कामे पूर्ण करून बिल सादर करूनही गेल्या चार वर्षांपासून शेतकरी जिल्हा परिषदेकडे निधीसाठी खेटे घालत आहेत.

लातूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) लातूर जिल्ह्यात २०२१ ते २०२६ या कालावधीत तब्बल ८ हजार १६० विकासकामे पूर्ण झाली आहेत. शेतरस्ते, विहिरी, जनावरांचे गोठे, घरकुल, शौचालये, वृक्षलागवड, बांबू लागवड, रोपवाटिका, फळबाग लागवड अशा विविध कामांमुळे ग्रामीण भागात विकास झाला असला, तरी या कामांसाठी शेतकऱ्यांनी केलेल्या कुशल मजुरीचे पैसे मात्र अद्याप मिळालेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी सध्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कामे पूर्ण करून बिल सादर करूनही गेल्या चार वर्षांपासून शेतकरी जिल्हा परिषदेकडे निधीसाठी खेटे घालत आहेत. मजुरांचे पैसे वेळेवर अदा झाले; मात्र कुशल कामाचा मोबदला रखडल्याने अनेक शेतकऱ्यांना कर्ज काढावे लागले, तर काहींनी खासगी सावकारांकडून पैसे उचलले आहेत. शासनाकडून निधी मिळाला नसल्याने अधिकारी लाभार्थींना ‘तारीख पे तारीख’ सांगत आहेत. मजुरांचे पैसे मिळाले; पण कुशल कामाचे पैसे मिळत नसल्याने रोहयोची नवीन कामे करायला कोणी धजावत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

कोणत्या तालुक्याचे किती रखडले?
लातूर तालुक्यात सर्वाधिक ३४ कोटी २४ लाख रुपये थकले असून उदगीर (२७ कोटी ५७ लाख), औसा (२१ कोटी ४ लाख), चाकूर (२० कोटी ३० लाख) आणि देवणी (१७ कोटी ५ लाख) या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात निधी अडकून पडला आहे. एकूण जिल्ह्यात सुमारे १७४ कोटी रुपयांहून अधिक निधी थकीत असल्याची स्थिती आहे.

‘काम केलं; पण मोबदला नाही’ शेतकऱ्यांची व्यथा
“शेतावर विहीर, गोठा, रस्ता अशी कामे स्वतःच्या पैशातून पूर्ण केली. शासनाकडून पैसे मिळतील या अपेक्षेवर कर्ज काढले; पण अजूनही कुशलचे पैसे मिळाले नाहीत,” अशी भावना अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वेळेवर पैसे मिळाले असते तर शेतीसाठी बी-बियाणे, खते, मजुरी यासाठी आधार मिळाला असता, असेही शेतकरी सांगतात.

नवीन कामांना ब्रेक
जुन्या कामांचा निधी मिळत नसल्यामुळे आता नवीन कामे हाती घेण्यास कंत्राटदार आणि शेतकरी दोघेही धजावत नाहीत. परिणामी, रोहयोचा उद्देश असलेला ग्रामीण रोजगार आणि विकास दोन्ही ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासनाने रखडलेला निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Latur Farmers Face Financial Hardship as MGNREGA Wages Delayed

Web Summary : Thousands of Latur farmers are struggling financially as ₹174 crore in MGNREGA skilled labor wages remain unpaid for completed works since 2021. Despite project completion, farmers haven't received payments, leading to debt and stalled new projects.
टॅग्स :laturलातूरAgriculture Sectorशेती क्षेत्र