त्या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषीवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:21 IST2021-04-28T04:21:32+5:302021-04-28T04:21:32+5:30

रुग्णालयातील एका डॉक्टरने औषधे उपलब्ध असतानाही रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितल्याच्या तक्रारीवरून तहसीलदार गणेश जाधव यांनी सदरील मेडिकलवर ...

Investigate the matter thoroughly and take action against the culprit | त्या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषीवर कारवाई

त्या प्रकरणाची कसून चौकशी करून दोषीवर कारवाई

रुग्णालयातील एका डॉक्टरने औषधे उपलब्ध असतानाही रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितल्याच्या तक्रारीवरून तहसीलदार गणेश जाधव यांनी सदरील मेडिकलवर छापा टाकून संबंधित पावत्या जप्त केल्या होत्या. डॉक्टर व मेडिकलचा अहवाल तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे. चौकशीअंती कारवाई केली जाईल, असे डॉ. सौंदाळे म्हणाले. दवाखान्यात सर्व औषधे उपलब्ध असल्याने रुग्णांच्या नातेवाइकांनी बाहेरून औषधे आणू नयेत. एखादे औषध नसेल तर त्याची खात्री करून पुढील निर्णय घ्यावा, असेही ते यावेळी म्हणाले.

सध्या येथील रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असल्यामुळे शेजारच्या तालुक्यातून गंभीर रुग्ण दाखल होत आहेत. सध्या ३ हजार ५३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. एक हजार रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

आतापर्यंत तालुक्यात २४ हजार १५० जणांना लसीकरण करण्यात आले आहे. रुग्णालयात ८ व्हेंटिलेटर, ४०० कोव्हिशिल्ड, १०० कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे, असेही ते म्हणाले.

Web Title: Investigate the matter thoroughly and take action against the culprit