शिक्षक समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:12+5:302021-09-07T04:25:12+5:30

येथील र.पू. क्षीरसागर यांच्यावरील गौरव अंकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या हस्ते करण्यात ...

The ideal personality in the teacher community | शिक्षक समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व

शिक्षक समाजातील आदर्श व्यक्तिमत्त्व

येथील र.पू. क्षीरसागर यांच्यावरील गौरव अंकाचे प्रकाशन महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी र.पू. क्षीरसागर, प्रतिभा क्षीरसागर, मारोती वझरकर, विक्रम हालकीकर, सुनील मादळे उपस्थित होते.

डॉ. लखोटिया म्हाणाले, शिक्षक हाच खरा समाज घडवणारा केंद्रबिंदू असल्यामुळे क्षीरसागर यांनी शिक्षणाबरोबरच आदर्श नागरिक घडविले आहेत. धनंजय गुडसूरकर यांनी समृद्ध कार्याचा व कृतज्ञतेचा वारसा हे सामाजिक संचित असते. या संचितात वाढ करण्याचे कार्य या गौरव अंकाने केले आहे, असे सांगितले.

प्रारंभी अनंत भदाडे व ऋषिकेश अनवले यांच्या संचाने शिक्षक गौरवगीत सादर केले. त्यासाठी अविनाश हेरकर, उजळंबकर, डॉ. अनुप चिकमुर्गे, विवेक खतगावकर, अमोल कदम, सचिन कलकोटे, सुनील कल्पे, तुषार भुत्ते, प्रशांत मांगूळकर आदींनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन विजय दीक्षित यांनी केले. प्रभूदास गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: The ideal personality in the teacher community