मोटारसायकलला पाठीमागून धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:21 IST2021-02-24T04:21:30+5:302021-02-24T04:21:30+5:30

दुचाकीला धडक, एक जण गंभीर जखमी लातूर : एमएच २४ जी ६४९९ या क्रमांकाच्या दुचाकीवरून जुन्या रेल्वे लाईन रस्त्याने ...

Hit the motorcycle from behind | मोटारसायकलला पाठीमागून धडक

मोटारसायकलला पाठीमागून धडक

दुचाकीला धडक, एक जण गंभीर जखमी

लातूर : एमएच २४ जी ६४९९ या क्रमांकाच्या दुचाकीवरून जुन्या रेल्वे लाईन रस्त्याने घराकडे जात असताना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच २४ एक्यू ४४५१ या क्रमांकाच्या दुचाकी चालकाने जोराची धडक दिली. यात फिर्यादीच्या उजव्या पायाचा अंगठा, कंबरेला, छातीला, डोक्याला मार लागला. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एमएच २४ एक्यू ४४५१ च्या चालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

जिवे मारण्याची धमकी, गुन्हा दाखल

लातूर : पंचवटीनगर येथे फिर्यादीच्या घराच्या भिंतीला चिटकून बेकायदेशीररीत्या संडास-बाथरुम बांधण्याचा प्रयत्न केला. याबाबत विचारपूस केली असता आरोपीने फिर्यादीस धक्काबुक्की केली व जिवे मारण्याची धमकी दिली, असे संदीप सुभाषराव हाजगुडे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार मोमीन खलील (रा. पंचवटीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Hit the motorcycle from behind