शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

औराद शहाजानी परिसरात दमदार पाऊस, १६ हजार हेक्टरवर साेयाबीनचा पेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST

औराद शहाजानी परिसरात गेल्या आठवड्यापासून चांगला दमदार पाऊस पडत आहे. बुधवार व गुरुवारी या दोन दिवसांत झालेल्या पावसाने पाणी ...

औराद शहाजानी परिसरात गेल्या आठवड्यापासून चांगला दमदार पाऊस पडत आहे. बुधवार व गुरुवारी या दोन दिवसांत झालेल्या पावसाने पाणी पातळी वाढली आहे. औराद कृषी मंडळात चार महसूल मंडळांचा समावेश असून त्यात औराद व कासार बालकुंदा या महसूल मंडळात शंभर टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. उर्वरित हलगरा व अंबुलगा या दोन महसूल मंडळांत पेरणी अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत औराद मंडळात १६ हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा झाला आहे. ७ हजार हेक्‍टरवर तुरीचा पेरा झाला आहे, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी एच.एम. पाटील यांनी दिली.

या वर्षी सर्वाधिक शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे मूग, उडदाचा पेरा कमी झाला. नगदी पीक व या वर्षी चांगला दर साेयाबीनला मिळाल्याने शेतकरी साेयाबीनकडे वळले आहेत.

औराद बंधाऱ्यात एक मीटरने पाणी वाढले...

जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला असून गत नऊ दिवसांत १२० मिमी पाऊस औराद मंडळात झाला आहे. त्यामुळे तेरणा नदीवरील औराद उच्चस्तरीय बंधाऱ्यात एक मीटरने पाणीसाठा वाढला आहे. सोनखेड उच्चस्तरीय बंधाऱ्यात दोन मीटर पाणीसाठा झाला आहे. हवामान खात्याने पुढील चार दिवस चांगला पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत.