शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

आजपर्यंत जळकोट मंडळात ८४७ मिमी. घेाणसी मंडळात ६७९ मिमी पाऊस सोमवारच्या रात्रीपर्यंत झाल्याची नोंद झाली. सरासरी तालुक्यात ७६३ मि.मी. ...

आजपर्यंत जळकोट मंडळात ८४७ मिमी. घेाणसी मंडळात ६७९ मिमी पाऊस सोमवारच्या रात्रीपर्यंत झाल्याची नोंद झाली. सरासरी तालुक्यात ७६३ मि.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे.

तालुक्यातील हळद वाढवणा, रावणकोळा या गावचे साठवण तलाव व पाझर तलाव काठोकाठ भरल्याने नद्यांना पूर येऊन जळकोट, रावणकोळा मार्ग बंद झाला आहे. तालुक्यातील १२ साठवण तलाव सोनवळा, करंजी, चेरा-१, चेरा-२, डोंगरगाव, ढोरसांगवी, जंगमवाडी, गुत्ती, माळहिप्परगा, हळदवाढवणा, रावणकोळा, जिरगा सर्व साठवून तलावे व पाझर तलाव हे ओव्हरफ्लो झाले असल्याने त्या खालील नदीला पूर आला आहे. पाण्यामुळे नदीकाठच्या, नाल्या काठच्या जमिनी खचून गेल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. वस्तीत व शेतीमध्ये पाणी घुसून पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन व उसाचे अतोनात नुकसान झाले आहे.

जळकोट येथील जांब रस्त्यावरील पाझर तलाव शंभर टक्के भरल्याने व पाणी जास्त कोंडल्याने तळ्याखालील शेतकऱ्यांनी प्रशासनाला सूचना देऊन तेथील तळ्याचा सांडवा फोडून पाण्याला वाट करून दिली आहे. यावेळी तलाठी युवराज करेप्पा उपस्थित होते. कुणकी वरून जाणारा धामणगाव, जिरगा, डोमगाव रस्ता नदीला पूर आल्याने बंद झाला आहे. नगदी हाताला आलेले सोयाबीन जमीनदोस्त झाले आहे. या नुकसान भरपाईचा तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी व पीक विमा लागू करावा, अशीही मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरत आहे.

अतरनूरमध्ये शिरले घरात पाणी...

अतनूर : पावसाच्या पाण्यामुळे अतनूर तिरू येथील नदीला पूर आला असून तिरू नदीवरील अतनूर गावालगत असलेल्या ३५ वर्षांनंतरचा जीर्ण झालेल्या पुलावरून पाणी तुडुंब भरून वाहत असल्याने दळणवळण व वाहतूक व्यवस्था ठप्प असून राज्य मार्ग संपूर्णत: बंद आहे. तसेच अतनूर गावातील नाली, रस्त्यावर कंबरे एवढे पाणी वाहत असल्याने व पाणी जाण्यासाठी पर्यायी नाली व सिमेंट रस्ते नसल्यामुळे घराघरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंचे, अन्न धान्ये, कपडे-लते सह इत्तर वस्तूची नासाडी झाली आहे. अतनूर तिरू नदीला महापूर आल्याने अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, मरसांगवी, सुल्लाळी, डोंगरगाव, तिरूका, बेळसांगवी गावालगत व तिरू नदी लगतच्या जमीन व शेतजमिनीवरील खरीप पिके जोरदार अतिवृष्टीने संपूर्णत: खरडून गेली आहेत.