शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

लेंडी नदीला आलेल्या पुरामुळे राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:25 IST

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील लेंडी नदीवर पाईप टाकून बांधण्यात आलेल्या कमी उंचीच्या पुलावरून तासन् तास पाणी वाहत ...

शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील दैठणा येथील लेंडी नदीवर पाईप टाकून बांधण्यात आलेल्या कमी उंचीच्या पुलावरून तासन् तास पाणी वाहत असल्यामुळे शिरूर अनंतपाळ, दैठणा, उदगीर राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प होत असून विविध गावांचा संपर्क तुटत आहे.

तालुक्यातील घरणी, मांजराच्या पटीत लेंडी नदी सुध्दा मोठी असल्याने लेंडी नदीवर साकोळ मध्यम प्रकल्प बांधण्यात आला आहे. त्यामुळे लेंडी नदीचे पात्र घरणी, मांजराइतकेच रुंद आहे. म्हणून दैठणा येथे लेंडी नदीवर बाॅक्ससेल पध्दतीने उंच आणि रुंद पूल बांधणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने उदगीर-लातूर वाहतूक सध्या उदगीर, दैठणा, शिरूर अनंतपाळ, लातूर या राज्यमार्गाने सुरू आहे.

पावसाळ्यात लेंडी नदीला पूर आला की, सातत्याने वाहतुकीचा खोळंबा होत आहे. राज्यमार्गावरील वाहतूक तासन् तास ठप्प होत आहे. शिरूर अनंतपाळहून उदगीरकडे जाणारी वाहने पलीकडे, तर उदगीरहून शिरूर अनंतपाळ, लातूरकडे जाणारी वाहने अलीकडे अडकून पडत आहेत. त्यामुळे त्याचा रहदारीस मोठा फटका बसत आहे. मंगळवारी जोरदार पाऊस पडल्यामुळे पुलावरून पाणी वाहत होते. त्यामुळे जवळपास दिवसभर वाहतूक ठप्प होती.

शेतकरी, शेतमजूर शेतातच अडकले...

दैठणा येथील अनेक शेतकऱ्यांचा बैलबारदाणा मळ्यातील गोठ्यावर असल्याने शेतकरी, शेतमजूर, सालगडी रात्रीच्या वेळी मळ्यातील गोठ्यावर मुक्कामासाठी जातात. सोमवारी रात्री गोठ्यावर मुक्कामासाठी गेलेल्या अनेकांना मंगळवारी पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे शेतातच अडकून पडावे लागले.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र पवार म्हणाले, लेंडी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविले आहे.