शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
5
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
6
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
7
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
8
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
9
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
12
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
13
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
14
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
15
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
17
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
18
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
19
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
20
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पाच गुन्ह्यांचा झाला उलगडा; ६ आराेपी अडकले जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

पाेलिसांनी सांगितले, पहिल्या घटनेत एका दुकानातील राेख ५२ हजार रुपये आणि दुसऱ्या घटनेत साेन्याचे दागिने चाेरुन नेल्यची घटना घडली ...

पाेलिसांनी सांगितले, पहिल्या घटनेत एका दुकानातील राेख ५२ हजार रुपये आणि दुसऱ्या घटनेत साेन्याचे दागिने चाेरुन नेल्यची घटना घडली हाेती. दरम्यान, याप्रकरणी कृष्णा राजेंद्र कांबळे (२८), इश्वर गजेंद्र कांबळे (१९) आणि अजय संताेष चव्हाण (२० रा. जयनगर, रिंगराेड लातूर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चाेरीतील ७ हजार २०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. दुसऱ्या घटनेतील मंगळसूत्र आणि २० हजार रुपये जप्त केले आहे. तिसऱ्या घटनेत साेन्याची बाेरमाळ आणि राेख रक्कम चाेरुन नेल्याची घटना घडली हाेती. याप्रकरणी पवन सहदेव जाधव (१८ रा. संजयनगर, औसा ह. मु. म्हाडा काॅलनी, लातूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यातील साेन्याची बाेरमाळ जप्त करण्यात आली आहे. चाैथ्या घटनेत अज्ञात चाेरट्यांनी साेन्याचे मणी-मंगळसूत्र, चांदीचे २५ ताेळ्याची चेन असा ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला हाेता. याप्रकरणी अविनाश काशिनाथ काळे (२८ रा. विलासनगर, लातूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चाेरीला गेलेल्या मुद्देमालापैकी चांदीची चैन जप्त करण्यात आली आहे. तर पाचव्या घटनेत राेख एक हजार आणि माेबाइल असा मुद्देमाल चाेरीला गेला हाेता. दरम्यान, याप्रकरणी गुरु सुभाष काळे (२७ रा. रिंगराेड, गरुड चाैक परिसर लातूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून राेख एक हजार आणि माेबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.