लातुरातील किर्ती ऑइल मिलच्या गाेदामाला आग, माेठे नुकसान
By राजकुमार जोंधळे | Updated: February 10, 2025 02:56 IST2025-02-10T02:55:28+5:302025-02-10T02:56:00+5:30
...दरम्यान, माेठ्या प्रयत्नानंतर ही आग रविवारी पहाटेपर्यंत आटाेक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीमध्ये माेठे नुकसान झाल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

लातुरातील किर्ती ऑइल मिलच्या गाेदामाला आग, माेठे नुकसान
लातूर : शहरातील एमआयडीसीत कळंब राेडवर असलेल्या किर्ती ऑइल मिलच्या गाेदामाला शनिवारी मध्यरात्री १ ते १.१५ वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग माेठी असल्याने अग्निशमन दलाच्या जवळपास दहा बंबांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले हाेते. दरम्यान, माेठ्या प्रयत्नानंतर ही आग रविवारी पहाटेपर्यंत आटाेक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीमध्ये माेठे नुकसान झाल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.
लातुरातील जुनी एमआयडीसी, कळंब राेडवर किर्ती ऑईल मिल असून, या कारखान्याच्या गाेदामाला शनिवारी रात्री १ ते १.१५ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. बघता-बघता आगीने राैद्र रुप धारण केले. घटनेची माहिती कारखाना व्यवस्थापनाने अग्निशमन दलाला दिली. एकापाठाेपाठ लातूर, रेणापूर, औसा आणि अहमदपूर येथील अग्निशमन दलाच्या जवळपास दहा बंबांना पाचारण करण्यात आले. जवनांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नानंतर रविवारी पहाटेपर्यंत ही आग आटाेक्यात आणण्यात यश आले. आग माेठी असल्याने दिवसभरात नुकसानीचा आकडा समाेर आला नाही. या आगीत माेठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे कारखान्याचे व्यवस्थापक प्रताप पाटील यांनी सांगितले.