शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे पिकांच्या उत्पादनात होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:20 IST

जळकोट : तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार व भीज पावसामुळे सोयाबीन, तूर, ज्वारीची पिके पिवळी पडली आहेत. मर्यादेपेक्षा जास्त ...

जळकोट : तालुक्यात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार व भीज पावसामुळे सोयाबीन, तूर, ज्वारीची पिके पिवळी पडली आहेत. मर्यादेपेक्षा जास्त पाऊस पडल्याने पिके पिवळी पडत असून, आगामी काळात या तिन्ही पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

जळकोट तालुक्यात आतापर्यंत ५२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर घोणशी मंडळात ३८६ मिलिमीटर पावसाची नोंद आहे. जोरदार पावसामुळे तालुक्यातील जलसाठ्यात व साठवण तलावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, तालुक्यातील चौदा साठवण तलावात चांगला पाणीसाठा झाला आहे. तालुक्यात ३४ हजार हेक्‍टर क्षेत्र असून, त्यापैकी २५ हजार हेक्टर पेरणीयोग्य आहे. त्यापैकी दहा हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे, तर उर्वरित क्षेत्रावर तुर, कापूस, ज्वारी, उडीद, मूग आदी पिके घेण्यात आली आहेत. गेल्या आठवड्यात पावसामुळे या पिकांच्या उत्पादनात बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अनेक ठिकाणच्या जमिनी पाण्याने खरडून गेल्र्या आहेत. पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून, लहान कोवळी पिके पिवळे पडली आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. जळकोट तालुका डोंगरीदरी, कपारी, मुरमाड जमिनीचा असल्याने या जमिनीला अतिवृष्टीचा पाऊस जास्तीचा झाला आहे. हलक्या जमिनीचे पिकांना पावसाचा तडाखा बसला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे आत्तापर्यंत झालेले नाही त्याचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

प्रकल्पातील पाणीसाठ्यात झाली वाढ...

तालुक्यातील हळद वाढवणा, रावणकोळा, माळहिप्परगा, जंगमवाडी, गुत्ती, घोणशी, सोनवळा, करंजी, जगळपूर, वांजरवाडा, डोंगर शेलदरा, ढोर सांगवी आदी प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. सद्यस्थितीत तालुक्यातील नदी, नाले भरून वाहत असून, विहिरी भरल्या आहेत.