शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

चाेरी केलेल्या आठ दुचाकी पाेलिसांनी केल्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर माेटारसायकली चोरीच्या घटना अज्ञातांकडून सुरू आहेत. या माेटारसायकल ...

पाेलिसांनी सांगितले, लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर माेटारसायकली चोरीच्या घटना अज्ञातांकडून सुरू आहेत. या माेटारसायकल चाेरीचे सत्र गत अनेक दिवसांपासून थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. याबाबत विविध पाेलीस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विवेकानंद चाैक पाेलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील माेटारसायकल चाेरीमधील संशयित आराेपी हा गुरुड चाैक, नवीन नांदेड नाका, लातूर परिसरात असल्याची माहिती पाेलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली. ताे नवीन नांदेड नाका परिसरात चाेरीतील माेटारसायकली विकण्याचा प्रयत्न करण्यासाठी फिरत आहे. अशीही माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गरूड चाैकात सापळा लावला. यावेळी अंबाजोगाई तालुक्यातील धानाेरा येथील १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे याबाबत अधिक चाैकशी केली असता, साथीदाराच्या मदतीने वेगवेगळ्या भागातून माेटारसायकली चाेरल्याची माहिती त्याने दिली. यातील दाेन माेटारसायकली माझ्या घरासमाेर थांबविण्यात आल्या आहेत, असे सांगितले. शिवाय, ताब्यातील मुलाने सांगितल्याप्रमाणे शिरूर अनंतपाळ येथून ६ माेटारसायकली पाेलीस पथकाने जप्त केल्या आहेत. ताब्यात असलेल्या मुलाकडून अन्य गुन्ह्यांची उकल हाेण्याची शक्यता पाेलिसांनी वर्तविली आहे.