'ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह'प्रकरणी दणका; न्यायालयाचा सहा जणांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 18:26 IST2026-05-09T18:25:35+5:302026-05-09T18:26:06+5:30

पोलिसांच्या जाळ्यात अडकले ६ तळीराम; उदगीर न्यायालयाने दिला दंडाचा 'प्रसाद'.

Drunk and Drive Action in Latur: Udgir Court Fines Six Drivers Rs 5,000 Each. | 'ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह'प्रकरणी दणका; न्यायालयाचा सहा जणांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड

'ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह'प्रकरणी दणका; न्यायालयाचा सहा जणांना प्रत्येकी पाच हजारांचा दंड

हाळी हंडरगुळी (जि. लातूर) : रस्त्यावरील वाढते अपघात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. मद्य प्राशन करुन वाहन चालवणाऱ्यांविरुद्ध सुरू असलेल्या विशेष मोहिमेत वाढवणा बु. पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सहा जणांना उदगीर न्यायालयाने प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड शनिवारी ठोठावला आहे.

वाढवणा बु. पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि हाळी हंडरगुळी परिसरात गेल्या काही दिवसांपासून मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी कडक तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेदरम्यान विकास शंकर जाधव, कमलेश विजयकुमार शिंदे, मगदुम युसूफ पठाण, आनंद बालाजी सूर्यवंशी, सुदर्शन सतिशराव देशमुख, महेश गोपाळराव पाटील हे सहा जण पोलिसांच्या जाळ्यात अडकले.

या सर्वांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम १८५ नुसार कायदेशीर कारवाई करून त्यांना उदगीर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. शनिवारी न्यायालयाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, प्रत्येक आरोपीला ५ हजार रुपयांचा आर्थिक दंड भरण्याचे आदेश दिले.

Web Title : शराब पीकर गाड़ी चलाने पर कार्रवाई: अदालत ने छह पर ₹5,000 का जुर्माना लगाया

Web Summary : उदगीर अदालत ने हाली हंडरगुली और वाढ़वाना में पुलिस की कार्रवाई के बाद शराब पीकर गाड़ी चलाने के आरोप में छह लोगों पर ₹5,000 का जुर्माना लगाया। नशे में गाड़ी चलाने वालों के कारण होने वाली दुर्घटनाओं को रोकने के उद्देश्य से प्रवर्तन में वृद्धि की गई, जिसके कारण उनकी गिरफ्तारी हुई और मोटर वाहन अधिनियम के तहत कानूनी कार्रवाई की गई।

Web Title : Crackdown on Drunk Driving: Court Fines Six ₹5,000 Each

Web Summary : Udgir court fined six individuals ₹5,000 each for drunk driving following a police crackdown in Hali Handarguli and Wadhavana. The increased enforcement aimed to curb accidents caused by intoxicated drivers, leading to their apprehension and subsequent legal action under the Motor Vehicle Act.