शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पाॅलिटेक्निकनंतर नोकरी मिळते का रे भाऊ? ३४०० जागांसाठी २४०० विद्यार्थ्यांचे अर्ज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:21 IST

लातूर : मागील काही वर्षांपासून पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली होती. यावर्षी या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या प्रमाणात ...

लातूर : मागील काही वर्षांपासून पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी प्रवेशाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरविली होती. यावर्षी या पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याच्या प्रमाणात काहीअंशी वाढ झाली असून, ३ हजार ४०० जागांसाठी २ हजार ४०० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

लातूर जिल्ह्यात १३ तंत्रनिकेतन असून, यामध्ये २ शासकीय तर ११ खासगी आहेत. शासकीयमध्ये ८२० विद्यार्थी क्षमता असून, खासगी महाविद्यालयात २ हजार ५८० क्षमता आहे. यंदाच्या वर्षांत संगणक, सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रीकल, इलेक्टॉनिक्स अन्ड कम्युनिकेशन, ऑटोमोबाइल या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. मागील काही वर्षांत पॉलिटेक्निककडे प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी झाले होते. परिणामी, काही खासगी महाविद्यालये बंद करण्यात आली. मात्र, आता पुन्हा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत आहे.

एकूण पॉॅलिटेक्निक महाविद्यालये - १३

एकूण प्रवेश क्षमता - ३४००

एकूण प्रवेश अर्ज - २४००

पॉलिटेक्निक महाविद्यालये -

शासकीय - ०२

खाजगी -११

महाविद्यालयात प्रवेश क्षमता -

शासकीय - ८२०

खासगी - २५८०

संगणक, इलेक्ट्रीककडे विद्यार्थ्यांचा ओढा...

दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा ओढा संगणक आणि इलेक्ट्रीकल या दोन शाखांकडे सर्वाधिक आहे. रोजगाराची शाश्वती असल्याने विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत आहे. या दोन शाखांना विद्यार्थ्यांची पसंती आहे.

म्हणून पॉलिटेक्निकला पसंती...

लहानपणापासूनच अभियंता होण्याची इच्छा होती. दहावीला चांगले गुणही मिळाले आहेत. त्यामुळे पॉलिटेक्निकला प्रवेश घेणार आहे. अर्जही भरला असून, गुणवत्ता यादीची प्रतीक्षा आहे. आवडीची संगणक शाखा मिळेल अशी अपेक्षा आहे. गुणवत्ता यादीनंतरच चित्र स्पष्ट होईल. - मानसी महामुनी, विद्यार्थिनी

अनेकांचा ओढा विज्ञान, वाणिज्य, कला शाखेकडे असतो. मात्र, पहिल्यापासून इंजिनिअर होण्याची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे इलेक्ट्राॅनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन शाखेसाठी अर्ज दाखल केला आहे. दहावीच्या गुणांमुळे आवडीचे कॉलेज मिळेल. इंजिनिअर होऊन बाहेर देशात नोकरी करण्याचे स्वप्न असल्याने पॉलिटेक्निक करीत आहे. - बालाजी जाधव, विद्यार्थी

प्राचार्य म्हणतात...

विद्यार्थ्यांचा पॉलिटेक्निकडे प्रतिसाद वाढत चालला आहे. तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची हमी असते. त्यातच महाविद्यालयात कॅम्पस येत असल्याने विद्यार्थी तंत्रनिकेतनकडे आकर्षित होत आहे. नामांकित कंपन्यामध्ये नोकरीची संधी मिळत असल्याने पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे.

-डॉ. अजय आगरकर

पॉलिटेक्निकच्या या वर्षांच्या प्रवेशासाठी शासनाच्या वतीने नियमावली दिली आहे. त्यानुसार ज्यांचे अर्ज कन्फर्म झाले नव्हते त्यांना संपर्क करून अर्ज भरण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद असून, रोजगाराची हमी असल्याने पॉलिटेक्निककडे विद्यार्थ्यांचे आकर्षण वाढले आहे. - व्ही.डी.नितनवरे