शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाच्याच्या मृत्यूप्रकरणी मामावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:13 IST

निलंगा (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील सिंदखेड येथील एकजण स्वत:च्या आईसोबत शिवीगाळ करत होता. तेव्हा १९ वर्षीय भाचा मामाला ...

निलंगा (जि. लातूर) : निलंगा तालुक्यातील सिंदखेड येथील एकजण स्वत:च्या आईसोबत शिवीगाळ करत होता. तेव्हा १९ वर्षीय भाचा मामाला शिवीगाळ करु नका, अशी विनवणी करु लागला. तेव्हा मामाने भाच्याच्या शर्टाच्या गच्चीला धरुन ढकलून दिले. त्यात भाच्याचे डोके पायरीच्या दगडावर आपटल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना २९ जून रात्री रोजी घडली. याप्रकरणी निलंगा पोलीस ठाण्यात मामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रथमेश प्रकाश बोलसुरे (वय १९ वर्षे, रा. सिंदखेड, ता. निलंगा) असे मयत भाच्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, सिंदखेड येथील बालाजी बब्रुवान जाधव हा २९ जून रोजी रात्री १०.३०च्या सुमारास आईसोबत शिवीगाळ करत होता. तेव्हा भाचा प्रथमेश बोलसुरे याने पाहिले आणि तो मामाला आजीला शिवीगाळ करू नका, अशी विनवणी करु लागला. तेव्हा बालाजी जाधव याने प्रथमेशच्या शर्टाच्या गच्चीला धरून ढकलून दिले. त्यात त्याचे डोके पायरीच्या दगडावर आपटल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला.

याप्रकरणी मयत मुलाची आई सुरेखा बोलसुरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी जाधव याच्याविरुद्ध कलम ३०४, ३२३, ५०४ भादंविप्रमाणे निलंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.