शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

आवर्त नावाचा मेघ धन; धान्य वाढवेल, ३ जूननंतर कोरोनाचे समूळ उच्चाटन होईल : पंचांगकर्त्यांचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:18 IST

उदगीर : खरिपाचा स्वामी शुक्र असल्याने यंदा पाऊस चांगला होऊन धन-धान्याची वृद्धी होईल. ३ जूननंतर मंगळ कर्क राशीत आल्यानंतर ...

उदगीर : खरिपाचा स्वामी शुक्र असल्याने यंदा पाऊस चांगला होऊन धन-धान्याची वृद्धी होईल. ३ जूननंतर मंगळ कर्क राशीत आल्यानंतर कोरोनाचे भारतातून समूळ उच्चाटन होईल, असा अंदाज पंचांगकर्त्यांनी वर्तविला आहे.

रोहिनी नक्षत्र तटावर पडले आहे. त्यामुळे पाऊस पुष्कळ पडून धन-धान्य समृद्धी होईल. १२ मार्चला रोहिणी नक्षत्रात मंगळ आल्यानंतर भारतात कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात आली आहे. ३ एप्रिलला मंगळ हा मृग नक्षत्रात आला आहे. मृग नक्षत्राचा स्वामी हा मंगळ आहे. मंगळ मृग नक्षत्रात आल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. १३ एप्रिल २०२१ गुढीपाडव्या दिवशी मंगळ मिथुन राशीत प्रवेश करतो. हिंदुस्थानची मकर रास समजली जाते. त्यामुळे राशीनुसार मंगळ सहाव्या स्थानात म्हणजेच रिपू (शत्रू) स्थानात व रोगाच्या स्थानात राहणार आहे. त्यामुळे राष्ट्रात त्याचा प्रादुर्भाव १७ मे २०२१ पर्यंत राहणार आहे. पुनर्वसू, नक्षत्राचा स्वामी गुरु असल्यामुळे या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल. ३ जून २०२१ रोजी मंगळ कर्कराशीत येत असल्यामुळे हिंदुस्थानातून कोरोनाचे समूळ उच्चाटन होईल. देशात एकंदरित शांततेचे वातावरण निर्माण होईल, असा अंदाज हैदराबाद येथील प्रख्यात दत्तभक्त योगी डॉ. प्रमोद वाकनीस यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी सरूरनगर येथील दत्तमंदिरात बोलताना व्यक्त केला. प्रारंभी आनंद व्यवहारे गुरुजी यांनी नवीन पंचांगांचे वाचन केले.