मांजरा नदीपात्रातील गाळात फसल्याने बैलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:28+5:302021-09-07T04:25:28+5:30

भातांगळी येथील शेतकरी विश्वनाथ मन्मथअप्पा मुचाटे यांची गट नं. ८३ मध्ये जमीन आहे. याच ठिकाणी गोठा असून, बारा महिने ...

Cat dies after cat falls into silt in river basin | मांजरा नदीपात्रातील गाळात फसल्याने बैलाचा मृत्यू

मांजरा नदीपात्रातील गाळात फसल्याने बैलाचा मृत्यू

भातांगळी येथील शेतकरी विश्वनाथ मन्मथअप्पा मुचाटे यांची गट नं. ८३ मध्ये जमीन आहे. याच ठिकाणी गोठा असून, बारा महिने शेतातच जनावरे बांधलेली असतात. सोमवारी बैलपोळ्याचा सण असल्याने मुचाटे हे बैलांना घेऊन गावाकडे निघाले होते. मात्र, शेतातून गावाकडे यायला त्यांना रस्ताच नसल्याने, मांजरा नदीपात्राशिवाय पर्यायच नाही. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बैलजोडी घेऊन मांजरा नदीच्या पाण्यातून जात होते. पाण्यातून रस्त्याचा अंदाज न आल्याने एक बैल गाळात फसून बसला. बराच वेळ त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, तो यशस्वी झाला नाही. अखेर एका बैलाचा मृत्यू झाला. घरी पूजेची तयारी करून ठेवली अन् वाटेतच बैल दगावल्याने कुटुंबीयांनी सणही साजरा केला नाही. शेतात जायला रस्ताच नसल्याने पावसाळ्यात जीव धोक्यात घालून पाण्यातूनच ये-जा करावी लागत असल्याचे विश्वनाथ मुचाटे यांनी सांगितले.

Web Title: Cat dies after cat falls into silt in river basin