शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अवैध व्यवसायाविराेधात माेहीम; साडेतीन काेटींचा मुद्देमाल जप्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 21:47 IST

५२० जणांविराेधात गुन्हा, १९ जणांना केले हद्दपार...

लातूर : नांदेड परिक्षेत्रातील नांदेड, लातूर, हिंगाेली आणि परभणी जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत वेगवेगळ्या पाेलिस पथकांनी धाडी टाकल्या. यात तब्बल ७ काेटींचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई दुसऱ्या टप्प्यात १ ते ३० जूनअखेर करण्यात आली. यात लातूर जिल्ह्यात ५२० जणांविराेधात गुन्हे दाखल केले असून, ३ काेटी ५० लाख १९ हजार ३३८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पाेलिसांनी सांगितले, नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यात अवैध दारु, मटका, जुगार, ऑनलाइन लाॅटरी, क्रिकेट बेटिंग, गुटखा, अंमली पदार्थ, वेश्याव्यवसाय, वाळू उपसा व वाहतूक आणि अवैध प्रवासी वाहतुकीविराेधात पाेलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशानुसार १ मे पासून अवैध व्यवसाय विराेधी अभियान सुरु करण्यात आले आहे. 

पाेलिसांनी राबविलेल्या अवैध व्यवसायविराेधात अभियान १ दरम्यान अवैध व्यवसायात गुंतलेल्या १ हजार ७२१ आराेपींविराेधात १ हजार ५६१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून एकूण ७ काेटी ७९ लाख ४७ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. १ ते ३० जून या दरम्यान, अवैध व्यवसायाविराेधात अभियानाचा दुसरा टप्पा हाेता. यामध्ये २ हजार ३१६ जणांविराेधात २ हजारे १७ गुन्हे दाखल करण्यात आले. यामध्ये ६ काेटी ९३ लाख ६० हजार ३६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अवैध वाळूविरुद्ध कारवाई; दीड काेटींचा मुद्देमाल जप्त.लातूर जिल्ह्यातील चाकूर येथील उपविभागी पाेलिस अधिकाऱ्यांनी अहमदपूर हद्दीत अवैध वाळूविराेधात कारवाई केली. यावेळी त्यांनी वाहनांसह वाळूचा साठा असा एकूण तब्बल १ काेटी ४५ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. जुलै महिन्यात अचानकपणे चार मासरेड केल्या जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस