लातूर जिल्ह्यातील हडोळती टोलनाक्यावर विचित्र अपघात, ट्रॅव्हल्स, जीप, टेम्पोची धडक; ९ जखमी, दोन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 00:18 IST2021-03-09T00:17:42+5:302021-03-09T00:18:27+5:30
शिरूर ताजबंद-मुखेड मार्गावरील हडोळती गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या टोलनाक्याजवळील उमरगा रेतू पाटीनजीक जीप चालकाचा ताबा सुटल्याने ती देगलूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र. एमएच २४ एबी ९८७७ ला समोरून जोरात धडकली. याचवेळी पाठीमागून येणारा टेम्पो जीपवर आदळला. (travels, jeep, tempo accident)

लातूर जिल्ह्यातील हडोळती टोलनाक्यावर विचित्र अपघात, ट्रॅव्हल्स, जीप, टेम्पोची धडक; ९ जखमी, दोन गंभीर
लातूर (अहमदपूर / हडोळती) - अहमदपूर तालुक्यातील हडोळती टोलनाक्याजवळ टेम्पो, ट्रॅव्हल्स आणि जीपचा विचित्र अपघात झाला. यात ९ जण जखमी झाले असून दोघे गंभीर आहेत. ही घटना सोमवारी रात्री उशिरा घडली. अपघातानंतर, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी धावपळ केली. यानंतर जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. (Bizarre accident at Hadolati toll plaza in Latur district, 9 injured, two serious)
शिरूर ताजबंद येथून जीप क्र. एमएच २६ एके २७७७ ही मुखेडकडे जात होती. या जीपच्या पाठीमागे किराणा साहित्य भरलेला टेम्पो क्र. एचएच २६ एच ४२५१ होता. दरम्यान शिरूर ताजबंद-मुखेड मार्गावरील हडोळती गावापासून २ किमी अंतरावर असलेल्या टोलनाक्याजवळील उमरगा रेतू पाटीनजीक जीप चालकाचा ताबा सुटल्याने ती देगलूरहून पुण्याला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र. एमएच २४ एबी ९८७७ ला समोरून जोरात धडकली. याचवेळी पाठीमागून येणारा टेम्पो जीपवर आदळला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा अपघात घडल्याची माहिती ग्रामस्थांना मिळताच त्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच पोलीस प्रशासन, आरोग्य विभागाने घटनास्थळी येऊन जखमींना उपचारासाठी हडोळती प्राथमिक आरोग्य केंद्र व अहमदपूरला पाठविले. या अपघातामुळे जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. ग्रामस्थ, पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
गंभीर जखमींना लातूरला हलविले...
अपघातात दिपक जाधव, रवी बाबुराव वळसे, अनिल गायकवाड, शिवराज जाधव, विजू कांबळे, अशोक शेटकार, वेदांत मोचे, ज्ञानोबा वाघमारे, द्रोपदबाई वाघमारे हे जखमी झाले आहेत. यातील दोघेजण गंभीर आहेत. जखमींना अहमदपूर व लातूरला हवलिवण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.