शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
नीट पेपरफुटीचा भंडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
3
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
4
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
5
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
6
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
7
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
8
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
9
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
10
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
11
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
12
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
13
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
14
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
15
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
16
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
17
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
18
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
19
‘ईपीएफ’चे पैसे ‘यूपीआय’द्वारे काढता येणार; तांत्रिक चाचणी यशस्वी
20
शिंदेसेनेच्या नगरसेवकांना १५४ कोटी; भाजपच्या वाट्याला केवळ ३ कोटी
Daily Top 2Weekly Top 5

'नीट' परीक्षार्थींना मोठा दिलासा; नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून अर्जाची मुदत वाढवली, सर्व्हरही सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 17:35 IST

सर्व्हर डाऊनची 'कटकट' संपली; २० मिनिटांत 'नीट'चा अर्ज अपलोड !

हणमंत गायकवाड

लातूर : तांत्रिक अडचणींमुळे 'नीट' परीक्षेचा फॉर्म भरण्यापासून वंचित राहिलेल्या लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने अर्ज भरण्यासाठी आता ११ मार्च रोजी रात्री ९ वाजेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. विशेष म्हणजे, संथ चालणाऱ्या सर्व्हरने आता वेग घेतल्याने पालकांची आणि विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे.

नीट परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख सुरुवातीला ८ मार्च होती. मात्र, ५ ते ८ मार्च दरम्यान सर्व्हरमध्ये प्रचंड तांत्रिक बिघाड झाल्याने एक फॉर्म भरण्यासाठी तब्बल अडीच ते तीन तास लागत होते. यामुळे लातूर शहर व जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी अर्ज करण्यापासून वंचित राहिले होते. पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

आताची स्थिती : २० मिनिटांत फॉर्म पूर्ण !
मुदतवाढीसोबतच आता साईटचा वेगही वाढला आहे. जिथे आधी तासनतास लागायचे, तिथे आता अवघ्या २० मिनिटांत फॉर्म पूर्ण अपलोड होत आहे.

अर्जाची नवीन मुदत : ११ मार्च, रात्री ९:०० वाजेपर्यंत.
शुल्क भरण्याची मुभा : ११ मार्च, रात्री ९:३० वाजेपर्यंत.

शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते...

अनेक विद्यार्थी तांत्रिक अडचणींमुळे फॉर्म भरू शकले नव्हते. मात्र, आता एजन्सीकडून मुदतवाढ मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची ही मोठी अडचण दूर झाली आहे.
— विनोद झरीटाकळीकर, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.

सध्या साईटने चांगला वेग घेतला आहे. २० मिनिटांत फॉर्म अपलोड होत असल्याने आता विद्यार्थ्यांनी चिंता करण्याची गरज नाही."
-सचिन बांगड, विद्यार्थी समुपदेशक व मार्गदर्शक.

सर्व्हरच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. परीक्षा एजन्सीने मुदतवाढ देऊन विद्यार्थ्यांना न्याय दिला आहे, त्याबद्दल त्यांचे आभार.
-भाऊसाहेब सरवदे, उपप्राचार्य, दयानंद विज्ञान महाविद्यालय.

English
हिंदी सारांश
Web Title : NEET Aspirants Get Relief: Application Deadline Extended, Server Speeds Up

Web Summary : NEET application deadline extended to March 11th due to technical issues. Server speed improved, addressing student concerns. Experts appreciate the extension, easing student difficulties and ensuring fair opportunity. Students can now complete forms quickly.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रlaturलातूर