बीदर-लातूर-मुंबई, कोल्हापूर-पुणे गाड्या पूर्वीप्रमाणेच धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:14 IST2021-06-30T04:14:01+5:302021-06-30T04:14:01+5:30

मागील अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे रेल्वेसेवा थांबविण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रेल्वेकडून खबरदारी म्हणून वाहतूक थांबविण्यात आलेली ...

Bidar-Latur-Mumbai, Kolhapur-Pune trains will run as before | बीदर-लातूर-मुंबई, कोल्हापूर-पुणे गाड्या पूर्वीप्रमाणेच धावणार

बीदर-लातूर-मुंबई, कोल्हापूर-पुणे गाड्या पूर्वीप्रमाणेच धावणार

मागील अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे रेल्वेसेवा थांबविण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रेल्वेकडून खबरदारी म्हणून वाहतूक थांबविण्यात आलेली होती. मागील काही दिवसांत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. रुग्णसंख्या घटलेली आहे. रेल्वेने काही मार्गांवर प्रवासी वाहतूक सेवा सुरू केलेली आहे. त्यामुळे लातुरातून धावणाऱ्या या दोन्ही गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी रेल्वेच्या झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केली होती. यासंदर्भात रेल्वेच्या महाप्रबंधकांसमवेत त्यांनी परत पत्रव्यवहारही केलेला होता. या मागण्यांची दखल घेत महाप्रबंधकांनी १ जुलैपासून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.

रेल्वे सेवा पूर्ववत होत असल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. लातूर येथून आठवड्यातील ४ दिवस लातूर-मुंबई, तर ३ दिवस बीदर-मुंबई ही रेल्वे पूर्वी धावत असे. याशिवाय कोल्हापूर-नागपूर ही रेल्वेही लातुरातून जात असे. पूर्वीप्रमाणेच या दोन रेल्वेगाड्या धावणार आहेत.

Web Title: Bidar-Latur-Mumbai, Kolhapur-Pune trains will run as before