रस्त्यावर काेणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:44+5:302021-09-22T04:23:44+5:30

लातूर जिल्ह्यातील लातूर-नांदेड, लातूर-औसा-तुळजापूर, लातूर-रेणापूर-अंबाजाेगाई आणि अहमदपूर अंबाजाेगाई या मार्गावर अशा लुटारूंच्या टाेळ्या सक्रिय असल्याचे काही घटनावरून पुढे आले ...

Beware if someone is arguing on the street for no reason ..! | रस्त्यावर काेणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान..!

रस्त्यावर काेणी विनाकारण वाद घालत असेल तर सावधान..!

लातूर जिल्ह्यातील लातूर-नांदेड, लातूर-औसा-तुळजापूर, लातूर-रेणापूर-अंबाजाेगाई आणि अहमदपूर अंबाजाेगाई या मार्गावर अशा लुटारूंच्या टाेळ्या सक्रिय असल्याचे काही घटनावरून पुढे आले आहे. अचानक वाहनला धक्का मारणे, यातून वाद घालणे आणि लुटण्याचा कट रचण्याचा प्रकार घडला आहे. यासाठी महामार्गावर आणि इतर ठिकाणी काेणी विनाकारण वाद काढत असेल, आपल्या वाहनाचा पाठलाग करत असेल तर सावध राहिले पाहिजे. एखाद्या ढाब्यावर चहा-नाश्त्यासाठी थांबणार असाल तर, तेथील परिस्थिती आणि वेळ पाहून थांबावे. अशावेळी आपला पाठलाग हाेण्याची शक्यता अधिक असते. पाेलिसांनी वाहन लुटण्याच्या, दराेड्याच्या तयारीत असलेल्या संशयितांना यापूर्वी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून धारदार शस्त्र, मिरची पूड आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे.

अनेकांची झाली ठिकठिकाणी लूट...

आपण प्रवास करत आहात, बाजारपेठेत आणि बॅंक परिसरात काही व्यवहारानिमित्त वावरत असाल तर अधिक काळजी घेण्याची गरज आहे. यावेळी आपल्याला काेणी गाेडगाेड बाेलत आहे का, काेणी जवळीकता साधून संवाद साधत असेल तर अधिक सावधानता बाळगली पाहिजे.

असे तुमच्याही बाबतीत घडू शकते...

१ जवळपास दीड लाखांची रक्कम एक पाेलीस कर्मचारी औसा राेडवरील बॅंकेतून घेऊन घराकडे निघाला हाेता. दुपारची वेळ हाेती, यावेळी एकजण म्हणाला, तुमच्या शर्टला काही तरी घाण लागली आहे. अशावेळी त्यांचे लक्ष विचलित झाले. यावेळी दीड लाखांची राेकड पळविण्यात आली. यातील चाेरटे अद्याप हाती लागले नाहीत.

२ काही दिवसांपूर्वी चाकूर ते शिरूर ताजबंद मार्गावर पहाटेच्या वेळी एका ढाब्यावरून चहा घेऊन निघालेल्या प्रवाशांना लुबाडण्यात आल्याची घटना घडली हाेती. वाहनावर ठेवण्यात आलेल्या बॅगांची दाेरी कापून त्या बॅगा पळविण्यात आल्या. यामध्ये साेन्या-चांदीचे दागिने आणि राेख रक्कम असा मुद्देमाल लंपास करण्यात आला.

काय काळजी घ्याल..?

आपण शहरासह बाजारपेठेत वावरताना संशयास्पद वाटणाऱ्या व्यक्तींपासून दूर राहावे. काेणी आल्यावर नजर ठेवून आहे का, याबाबत सावधानता बळगावी. प्रवासादरम्यान, काेणाही अनाेळखी व्यक्तीशी फारसा संवाद साधू नये, काेणी खाद्यपदार्थ देत असेल तर ते स्वीकारू नये. त्याचबराेबर चाैकात किंवा रस्त्यावर आपल्याशी काेणी विनाकारण हुज्जत घालत असेल, वाद घालत असेल तर समयसूचकता बाळगत सुरक्षित ठिकाण गाठावे. अशा वेळी समाेरचे चार-पाच जण आणि आपण एकटे असताे. त्याचवेळी आपणाला लुटण्याचा प्रयत्न केला जाताे.

Web Title: Beware if someone is arguing on the street for no reason ..!