शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, फेस्टिव्हल ऑफर्सच्या नावाखाली हाेऊ शकते फसवणूक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:21 IST

ऑनलाईन शाॅपिंगच्या माेहात आता बहुतांश ग्राहक अडकत चालला आहे. सुरक्षित आणि सजग राहून शाॅपिंग केल्यास ऑनलाईन खरेदीचे फायदे अधिक ...

ऑनलाईन शाॅपिंगच्या माेहात आता बहुतांश ग्राहक अडकत चालला आहे. सुरक्षित आणि सजग राहून शाॅपिंग केल्यास ऑनलाईन खरेदीचे फायदे अधिक असल्याचा अनुभव अनेकांच्या पदरी आहे. दुकानात, माॅल, हाेलसेल बाजारात एखादी वस्तू खरेदी करताना ग्राहक दहावेळ विचार करून पारखून खरेदी करताे. खरेदीच्या या दालनांचा व्हर्च्युअल अनुभव आता विविध ॲप्सच्या एका क्लिकवर आला आहे. ऑनलाईन कंपन्यांचा बाजारही सध्याला काेरोना काळात जाेमात आहे. दसरा आणि दिवसाळीनिमित्त आता अनेक कंपन्यांकडून ऑफर्सची खैरातच असते. महागड्या वस्तू, खाद्यपदार्थ, कपडे, ज्वेलरी, गिफ्टस अशा अनेक वस्तूंवर भरघाेसपणे सवलती देत ग्राहकांना आकर्षित केले जाते. सध्याला प्रत्येकांच्या हातात स्मार्टफाेन आहेत. त्यामध्ये विविध ॲप्स, ऑनलाईन कंपन्यांकडून देण्यात येणाऱ्या ऑफरचे नाेटिफिकेशन इनबाॅक्समध्ये राेज येऊन पडत आहेत.

अशी हाेऊ शकते फसवणूक...

१ एखादी वस्तू दहा रुपयांमध्ये खरेदी करताना शंभर ग्रॅम असेल तर एक किलाेसाठी शंभर रुपये किंवा त्यापेक्षा कमी किंमत असायला हवी. मात्र, एमआरपी कायद्यात अशी तरतूद नसल्याने त्याचा गैरफायदा घेत एफएमजीसी क्षेत्रात छाेटे पॅक स्वस्त दाखवून, तर माेठे पॅक महाग विकून अनाकलनीय पद्धतीने लूट केली जाते. १०० ग्रॅम चहाच्या पॅकची किंमत ३५० रुपयांना असावी लागते. मात्र, त्यांची किंमत ४७० रुपये लावली जाते. १२० रुपयांनी महाग असते.

२ विविध ऑनलाईन खरेदीच्या वस्तूची जाहिरात साेशल मीडियातून केली जाते. ऑनस्क्रीन सुंदर आणि आकर्षक असा वस्तूचा फाेटाे दाखविला जाताे. वस्तूची किंमत कमी दाखविलेली असते. ती ऑनलाईन खरेदी केल्यानंतर घरी येते. मात्र, तिची क्वाॅलिटी किती खराब असते, हे काही दिवसांत समाेर येते. ४२५ रुपयांमध्ये आकर्षक वस्तू दाखविला जाताे. प्रत्यक्षामध्ये ताे काही दिवसांमध्ये खराब हाेताे. ताेच बूट जर आपण दुकानातून खरेदी केला तर अवघ्या ५०० रुपयांमध्ये दर्जेदार म्हणून आपल्याला मिळत असताे.

ही घ्या काळजी...

एखाद्या कंपनीची वस्तू खरेदी केली तर त्या कंपनीची ऑनलाईन खरेदीबाबतची माहिती पडताळून पाहावी. त्यामुळे आपली हाेणारी फसवणूक टाळता येईल.

कंपनीची किंवा वेबसाइटची सत्यता पडताळून पाहावी. संबंधित वेबसाइटवर त्याबाबतची काय माहिती देण्यात आली आहे, याचीही माहिती पाहण्याची गरज आहे.

खरेदी झाल्यानंतर आर्थिक तपशील भरताना काळजी घ्यावी. आपल्या बँक खात्याची खरी वेबसाइट लिंक दिली असेल तर त्याचे तपशील भरावेत.

ऑनलाईनपेक्षा कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय उत्तम असून, हा पर्याय निवडावा. परिणामी, यातून खरेदी करताना काही चूक झाली तर आपण दिलेल्या रकमेचा घाेळ हाेणार नाही.