शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST

अहमदपूर : अहमदपूर व चाकूर तालुक्यात गतवर्षी पावसामुळे व खराब वातावरणामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात अवेळी पाऊस, ...

अहमदपूर : अहमदपूर व चाकूर तालुक्यात गतवर्षी पावसामुळे व खराब वातावरणामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. तालुक्यात अवेळी पाऊस, धुके पडून तुरीचा व कापसाचाही खराटा झाला. त्यामुळे पीक विमा कंपनीने शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य तथा माजी मंत्री विनायकराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गतवर्षी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे महसूल विभाग व कृषी विभागाने केले होते. त्याआधारे शासनाने नुकसानभरपाईचे अनुदान शेतकऱ्यांना दिले होते. तेच पंचनामे ग्राह्य धरून विमा कंपनीकडून पीक विमा मंजूर करून घ्यावा. अनेक शेतकऱ्यांनी नुकसानाचे फोटो ऑनलाईन केले नाहीत, त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मंजूर करावा, लाॅकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी दूषित वातावरण व पावसामुळे पिकांवर पडलेल्या अनेक रोगांमुळे उत्पन्नात कमालीची घट झाली असून, शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा देण्यात यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याविषयीचे निवेदन उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविण्यात आले. यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक गुट्टे, राजकुमार मजगे, भाजप तालुकाध्यक्ष हणमंतराव देवकते, अशोकराव चिंते, आर. डी. शेळके, हरीभाऊ येरमे, विठ्ठलराव बोडके, संग्राम चामे, प्रशांत पाटील, शिवाजी बैनगिरे, राम बेल्लाळे, कमलाकर पाटील, नीळकंठ पाटील, राजू खंदाडे, गोविंद गिरी, देवानंद मुळे, अमित रेड्डी, अजय काळे, प्रेमचंद शेळके, शिवराज पाटील, चंदकांत गंगथडे, प्रमोद जोशी, अजित खंदारे, डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी, विक्रम भोसले, नगरसेवक राहुल शिवपुजे, निखिल कासनाळे, धनराज पाटील, कमलाकर शेकापुरे, शकूर जागीरदार, सुखदेव कदम, चंद्रसेन पाटील, प्रताप पाटील, संतोष कोटलवार, शिवराज चोथवे, अर्जुन गंगथडे, शंकर मुळे, शंकर चाटे, पांडुरंग कांबळे, आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.