अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:25 IST2021-09-17T04:25:06+5:302021-09-17T04:25:06+5:30

महाराष्ट्र शासनाने महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत २०१९ मध्ये अंगणवाडी सेविकांना अँड्रॉइड मोबाईल देऊन अंगणवाडीची सर्व माहिती मोबाईलद्वारे भरण्यात येत ...

Anganwadi workers return mobile | अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले परत

अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले परत

महाराष्ट्र शासनाने महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत २०१९ मध्ये अंगणवाडी सेविकांना अँड्रॉइड मोबाईल देऊन अंगणवाडीची सर्व माहिती मोबाईलद्वारे भरण्यात येत होती. मोबाईलमध्ये मराठी भाषेत ॲप असल्याने माहिती भरण्यासाठी सोपे जात होते. परंतु, पुन्हा शासनामार्फत पोषण ट्रॅकर इंग्रजी माध्यमातून देण्यात आले. त्यातच दिलेला मोबाईल हा कमी रॅमचा असल्याने हँग होण्याचे प्रमाण वाढल्याने काही अंगणवाडी सेविकांचे मोबाइल बंद पडले. दुरुस्तीसाठी शासनाकडून कसलीही तरतूद करण्यात आलेली नाही, त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी मोबाईल आम्हाला नको म्हणत मोबाईल एकत्र जमा करून संबंधित विभागाकडे सुपूर्द केले.

६०० पैकी ५०० मोबाईल केले जमा...

तालुक्यातील अंगणवाडी सेविकांकडून ६५० पैकी ५०० मोबाइल जमा करण्यात आले असून, राज्यभरात जवळपास एक लाखहून अधिक अंगणवाडी सेविकांनी मोबाईल परत केल्याची माहिती अंगणवाडी सेविका व मदतनीस संघटनेचे अध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी दिली.

Web Title: Anganwadi workers return mobile