निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:20 IST2021-01-23T04:20:10+5:302021-01-23T04:20:10+5:30

जळकोट : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भत्त्याचे वाटप करावे, अशी मागणी शुक्रवारी जळकोट तालुका शिक्षक समन्वय ...

Allowances should be given to election staff | निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा

निवडणुकीतील कर्मचाऱ्यांना भत्ता द्यावा

जळकोट : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना भत्त्याचे वाटप करावे, अशी मागणी शुक्रवारी जळकोट तालुका शिक्षक समन्वय समितीने तहसीलदार संदीप कुलकर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जळकोट तालुक्यामध्ये २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी सुरळीत पार पाडली. या निवडणुकीत काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाच्या भत्त्याचे वाटप करावे. इतर जिल्ह्यांमध्ये भत्त्याचे वाटप करण्यात आले आहे. परंतु, जळकोट तालुक्यात अद्याप भत्त्याचे वाटप झालेले नाही. ते लवकरात लवकर करावे, अशी मागणी तालुका शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रकाश मरतुळे, सचिव विजय तेलंग, सहशिक्षक तुकाराम वंजे, आर. पी. नागरगोजे, गणपतराव गादगे, आर. एन. नागरगोजे, रवीकुमार भोसले, टी. बी. राजगीरवाड, एल. एन. नामवाड, बालाजी डावकरे, एन. टी. चोले आदींनी केली आहे.

Web Title: Allowances should be given to election staff