शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

'काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली; भाकितासाठी ज्योतिषी कशाला?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2019 2:31 PM

मुख्यमंत्री फडणवीस : थोरातांनीच आरशात पहावे, आम्ही जनतेच्या चेहऱ्यात पाहतो

लातूर : काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली आहे, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही, असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना लगावताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरातांनाही आरशात पाहण्याचा उलट सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिला. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने लातुरात रविवारी सकाळी विश्रामगृहावर पत्रपरिषदेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, माझ्या टीकेला उत्तर देताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मुख्यमंत्री काय ज्योतिषी आहेत काय? मी त्यांना सांगू इच्छितो तुमची हवा संपली आहे, हे भाकित करायला ज्योतिषाची गरज नाही. शिवाय, मला आरशात पाहण्याची गरज नाही. आम्ही जनतेच्या चेहऱ्यात पाहतो. त्यामुळे आरशात पाहण्याची वेळ कोणावर आली आहे हे थोरातांनी समजून घेण्याची गरज आहे. 

८३ मतदारसंघात यात्रा...दुसऱ्या टप्प्याच्या यात्रेचा सोलापुरात समारोप होत असून, २ हजार ४४३ किलोमीटरचा प्रवास आणि ८३ मतदारसंघ पूर्ण झाले आहेत. त्यात मराठवाड्याने भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या भागाच्या दुष्काळमुक्तीवर भर राहील. जलआराखडा तयार आहे. ६४ हजार किलोमीटरची पाईपलाईन जोडून वॉटर ग्रीड साकारले जाईल. लातूर -उस्मानाबादच्याही निविदा निघतील. तसेच लातूरला उजनीचे पाणी देणार, असेही ते म्हणाले.  यावेळी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रृंगारे, आ. सुधाकर भालेराव, आ. सुजितसिंह ठाकूर यांची उपस्थिती होती.

मराठवाड्याला हक्काचे १०२ टीएमसी पाणी मिळणार४मराठवाड्याच्या हक्काचे १०२ टीएमसी पाणी आहे. परंतु, ८० टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरु शकत नाही. ते वाहून जाते. त्यामुळे हक्काचे १०२ टीएमसी पाणी वापरण्यासाठी कोणत्याही प्राधिकरणाकडे जाण्याची गरज नाही. त्याच अर्थाने धरणे, प्रकल्प उभारण्यावरही बंधन राहणार नाही, असे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले. 

मेगा भरती नाही; निवडक भरती४जागावाटप पाहूनच निवडकांना प्रवेश दिला जात आहे. आमच्याकडे मेगा भरती नाही परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीत मेगा गळती नक्कीच आहे. इनकमिंगमुळे मूळ भाजपावर अन्याय होईल काय, या प्रश्नावर ते म्हणाले ९८ टक्के मूळ भाजपाच आहे. २ टक्केसुद्धा नवीन नाहीत.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस