आशिवजवळ अपघात; उदगीरच्या माजी नगराध्यक्षाचा मुलगा जागीच ठार

By संदीप शिंदे | Published: January 9, 2024 12:25 PM2024-01-09T12:25:09+5:302024-01-09T12:26:10+5:30

या अपघातात कारमधील अन्य दाेघे किरकोळ जखमी झाले आहेत.

accident near aashiv the son of the former mayor of udgir was died on the spot | आशिवजवळ अपघात; उदगीरच्या माजी नगराध्यक्षाचा मुलगा जागीच ठार

आशिवजवळ अपघात; उदगीरच्या माजी नगराध्यक्षाचा मुलगा जागीच ठार

- शिवशंकर बोपचंडे
बेलकुंंड (लातूर) : औसा तालुक्यातील आशिव पाटीजवळ झालेल्या कार अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील अन्य दाेघे किरकोळ जखमी झाले आहेत.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशिव पाटी येथे परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची वाहतूक करणारा टेम्पो नादुरुस्त अवस्थेत उभा होता. त्यावेळी सोलापूरहून लातूरकडे प्रसाद निटूरे हे एमएच २४ एएस १६०० या क्रमाकांच्या कारने येत होते. दरम्यान, या कारची टेम्पाेला पाठीमागून जोराची धडक बसली. त्यात प्रसाद निटूरे गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, त्यांच्यासोबतचे अन्य दोघे किरकोळ जखमी आहेत. महामार्गावरील काहींनी तात्काळ जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रसाद निटूरे यांचे रुग्णालयात येईपर्यंत निधन झाले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Web Title: accident near aashiv the son of the former mayor of udgir was died on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात